Veer Savarkar : वीर सावरकर विचारांची ‘एक तरी पणती लावुया…’

39
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा गोवर्धन पर्वत उचललं तेव्हा तिथे असलेल्या प्रत्येकाने काठ्या टेकवल्या. भगवान श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलण्यात सक्षम आहेत. परंतु भगवंत आपल्याला कर्मवाद शिकवतात. म्हणूनच कार्यरत राहणे हे कोणत्याही भक्ताचे परम कर्तव्य आहे. आपण खाटेवर बसून राहिलो तर देव आपले काम करणार नाही, पण जर आपण कार्यरत राहिलो तर देव आपल्याला यश देईल, हा कर्मवाद आहे. सावरकरांच्या विचारांवरुन चालणाऱ्या मोठमोठ्या संस्था आपलं कार्य करीत आहेत. पण ते कार्य करीत आहेत म्हणून आपण निवांत राहायची गरज नाही. आपणही आपल्या परीने काम करत राहिलं पाहिजे.

स्वातंत्र्य कोणामुळे मिळालं असा प्रश्न विचारला असताना सावरकर म्हणाले की, ‘ज्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी देवापुढे एक फुल जरी अर्पण केलं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा स्वातंत्र्य मिळालं आहे.’ सांगायचं तात्पर्य की गोवर्धन उचलणारा महत्त्वाचाच आहे, परंतु काठ्या टेकवणंही आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी अशा संस्था उभ्या राहुन कार्यरत राहणे आवश्यक आहे. आपण आपल्या आयुष्यात समाजकार्याची एक तरी पणती लावावी हे ध्येय महत्त्वाचे आहे. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे समाज संघटन, समाजसेवा, समाज प्रबोधन या उद्देशाने ‘परशुराम प्रतिष्ठान, येवला’ या संस्थेची स्थापना दिनांक ८ मार्च २०१२ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आली.

(हेही वाचा Bangladesh मध्ये पुन्हा हिंदू मंदिरावर हल्ला; धर्मांधाने बॉम्बस्फोट करत केली मूर्तीची तोडफोड)

लोकांना एकत्र करायचं असेल तर लोकांना सोबत नेणारी कामे करावी लागतात. या संघटनेतर्फे भगवान परशुराम जयंती उत्सव शोभायात्रा, कुंकू मार्चन, हळदी कुंकू यासारखे विविध धार्मिक उपक्रम साजरे केले जातात. हळदी कुंकू या कार्यक्रमातून समाजप्रबोधन करण्याचेही काम केले जाते. सर्व महिलांना एकत्र आणण्यासाठी हळदी कुंकूसारखा दुसरा सुंदर कार्यक्रम नाही. तसेच संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती व पुण्यतिथीनिमित्त सावरकर प्रतिमा पूजन व सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला जातो. यानिमित्त तरुणांचे प्रबोधन केले जाते.

तरुण घडवायचे असतील तर सावरकरांचे साहित्य म्हणजे ‘बौद्धिक एनर्जी ड्रिंक’ आहे. सावरकरांचे साहित्य वाचण्यास उपलब्ध करून लोकांना सावरकरमय वातावारणात राहण्यास प्रोत्साहित केले जाते. सावरकर विचारांच्या अनेक संस्थांशी संपर्क ठेऊन त्यांचेही विचार व कार्य समाज बांधवांपर्यंत पोहोचवले जाते. वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. बाळासाहेब देशमुख (संस्थापक), श्रीरंग सावरगावकर (अध्यक्ष), राम कुलकर्णी (कार्याध्यक्ष), स्वाती सावरगावकर (महिलाध्यक्ष), अमित पाटील (खजिनदार) हे पदाधिकारी असून अनेक स्वयंसेवक कार्यरत आहेत. सावरकर विचारांच्या महामार्गामध्ये आपण एक पणती लावतोय, याचा आनंद सर्व पदाधिकारी आणि स्वयंसेवकांच्या चेहऱ्यावर सदैव फुललेला दिसतो.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.