जयेश शत्रुघ्न मेस्त्री
वाद झाल्याशिवाय साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) पूर्ण होत नाही अशी परंपरा दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रात पडली आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी ही सेक्युलर परंपरा अत्यंत घातक आहे. ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२५ मध्ये दिल्लीत होणार आहे. या संमेलनाच्या आयोजनाबाबतची माहिती पत्रिका प्रसिद्ध झाली आणि नेहमीप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांना (swatantryaveer Savarkar) डावलण्यात आले. या माहिती पत्रकावर सावरकरांचे छायाचित्र नव्हते. कहर म्हणजे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे छायाचित्र छापण्यात आले होते. पण साहित्य जगतात मोलाची कामगिरी करणारे व मराठी भाषेला नवे शब्द देऊन व जुने शब्द पुनरुज्जीवीत करुन समृद्ध करणारे साहित्यिकांसाठी पूजनीय व अनुकरणीय असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव वगळण्यात आले. (Veer Savarkar)
साहित्य संमेलनाच्या (Marathi Sahitya Sammelan) आयोजकांच्या दृष्टीकोनातून प्रतिभाताई पाटील यांनी साहित्य जगतात प्रचंड मोठी कामगिरी केली आहे आणि बालपणापासून विपुल साहित्य रचणारे सावरकर मात्र येथे अस्पृश्य ठरले. सावरकरांनी जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात काव्यरचना व साहित्य निर्मिती केलेली आहे. अगदी बालपणी गाण्याच्या भेंड्या खेळताना जागच्या जागी स्वतः रचलेल्या कविता म्हणून दाखवणे, विलायतेत आपल्या साहित्य कृतीने इंग्रजी साम्राज्य हलवणे, मातृभूमीच्या विरहात सागरा प्राण तळमळला हे विरहगीत रचणे, अंदमानातील अनेक काव्य व माझी जन्मठेप, नाटके, ललित, वैचारिक, निबंध इत्यादी साहित्याच्या (Swatantryaveer Savarkar literature) विविध प्रांगणात सावरकरांनी मनसोक्त विहार केलेला आहे.
(हेही वाचा – Cyrus Poonawalla Net Worth : ९४३ कोटींच्या लिंकन हाऊसचे मालक सायरल पुनावाला यांची संपत्ती किती?)
जसे सावरकरांचे नाव घेतल्याशिवाय हिंदुत्वाची (Hinduism) व्याख्या करता येत नाही अगदी तसेच जगाचा अंत होईपर्यंत जेव्हा जेव्हा साहित्याची चर्चा होईल, तेव्हा तेव्हा सावरकरांचे नाव घेतले जाईल. मराठी भाषेला समृद्ध करण्यामध्ये सावरकरांचा सिंहाचा वाटा आहे. खरे पाहता साहित्य संमेलनात सावरकरांचा सन्मान झाला पाहिजे. कारण सावरकर हे असे साहित्यिक होते, ज्यांनी देश स्वतंत्र करण्याकरिता एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात लेखणी घेतली होती. बल, बुद्धी आणि विद्या याचे सावरकर प्रतीक आहेत. परंतु सावरकरांचे नाव ऐकूनच स्वतःस बळेच पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या जमातीच्या मनाचा थरकाप उडतो. ज्याप्रमाणे हनुमंताचे नाव घेऊन भूत प्रेत पिशाच्च पळतात. तसेच छद्म पुरोगामी, लेफटिस्ट और कॉंग्रेसी निकट नही आवे, विनायक जब नाम सुनावे!
(लेखक स्तंभलेखक आणि वक्ता आहेत.)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community