Venkataraman Radhakrishnan : स्पेस सायंटिस्ट वेंकटरमन राधाकृष्णन

वेंकटरमन राधाकृष्णन यांचा जन्म १८ मे १९२९ साली तेव्हाच्या मद्रास आणि आताच्या चेन्नई येथील तोंडियारपेट नावाच्या उपनगरात झाला.

324
Venkataraman Radhakrishnan : स्पेस सायंटिस्ट वेंकटरमन राधाकृष्णन
Venkataraman Radhakrishnan : स्पेस सायंटिस्ट वेंकटरमन राधाकृष्णन

वेंकटरमन राधाकृष्णन (Venkataraman Radhakrishnan) हे एक भारतीय स्पेस सायंटिस्ट होते. त्यासोबतच ते रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्यही होते. रिटायर होण्याआधी वेंकटरमन हे भारतातल्या बंगळुरू इथल्या रमण रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर होते. त्याआधी १९७२ ते १९९४ सालादरम्यान वेंकटरमन हे या इन्स्टिट्यूटचे संचालक होते. ही इन्स्टिट्यूट त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावरून सुरू केली होती.

याव्यतिरिक्त १९८८ ते १९९४ सालादरम्यान वेंकटरमन यांनी वेगवेगळ्या समित्यांवर इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियनचे उपाध्यक्षपदी काम केलं आहे. तसेच ते ‘रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेस आणि यू.एस. नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’चे फॉरेन फेलोही होते. तसेच ते ‘रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’ चे असोसिएट फेलो होते. तर भारतातल्या बंगळुरू इथल्या ‘इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस’चे फेलो होते. (Venkataraman Radhakrishnan)

(हेही वाचा – राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल…; PM Modi यांचे शरद पवारांना आव्हान)

वेंकटरमन राधाकृष्णन (Venkataraman Radhakrishnan) यांचा जन्म १८ मे १९२९ साली तेव्हाच्या मद्रास आणि आताच्या चेन्नई येथील तोंडियारपेट नावाच्या उपनगरात झाला. त्यांचे वडील नोबेल पारितोषिक विजेते होते. त्यांचं नाव भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरमन असं होतं. त्यांच्या आईचं नाव लोकसुंदरी अम्मल असं होतं.

वेंकटरमन राधाकृष्णन (Venkataraman Radhakrishnan) यांचं सुरुवातीचं शालेय शिक्षण मद्रास म्हणजेच चेन्नईतच झालं. पुढे त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी बंगळुरू इथल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ येथे भौतिकशास्त्र या विभागात ऍडमिशन घेतलं.

वेंकटरमन रामकृष्णन (Venkataraman Radhakrishnan) यांना खगोलशास्त्रातल्या आपल्या योगदानासाठी २००५ साली एम.पी. बिर्ला मेमोरियल अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.