लता मंगेशकरांच्या आरोग्याची मोठी अपडेट! दिदींच्या आरोग्यासाठी काय म्हणाले आरोग्यमंत्री

137

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या आरोग्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून अनेक अफवा पसरविल्या जात आहे. मात्र आता अधिकृत माहिती समोर येत आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते आणि ते अद्याप सुरू आहे.

आरोग्यमंत्र्यांचं विठ्ठलाला साकडं

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. लता दिदींचे व्हेंटिलेटर काढलं आहे. उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहेत. लता दिदींच्या उत्तम आरोग्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी विठ्ठलाला साकडे देखील घातले असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

लता दीदींच्या घरात काम करणाऱ्या मोलकरीला कोरोनाची लागण झाल्याने 92 वर्षीय लता मंगेशकर यांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले होते. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयात दाखल केल्यापासून लता मंगेशकरांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने दोन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे, असे लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितले.

(हेही वाचा – मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महिलांचे प्रभाग ११४ वरून ११८)

समोर आलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनिया देखील झाला आहे, ज्याला कोविड न्यूमोनिया असेही म्हणतात. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या लता मंगेशकर आयसीयूमध्येच दाखल असून पाच डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.