मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

113

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि ज्येष्ठ कलाकार प्रदीप पटवर्धन यांचे मंगळवारी 9 ऑगस्टला ह्रदयविकाराने राहत्या घरी निधन झाले. नाटक, मालिका आणि सिनेमा या सर्वच क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रदीप पटवर्धन यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने ज्याप्रमाणे मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे, त्याचप्रमाणे त्यांचे चाहतेही शोकाकुल झाले आहेत. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अपर्ण केली आहे.

अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी वयाच्या 65 वर्षी अखेरचा श्वास घेतला. मोरुची मावशी या नाटकातील त्यांचे काम आजही रसिकांच्या स्मरणात आहे. या नाटकातील भैया पाटील ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष आवडीची. भरत जावध, विजय पाटकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसह त्यांनी रंगभूमी गाजवली आहे.

( हेही वाचा: ‘एनआयए’ चा अधिकारी असल्याचे सांगत कुख्यात गँगस्टरकडूच उकळले ५० लाख; भामट्याला अटक )

या चित्रपटांत केलंय काम

प्रदीप पटवर्धन हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी एक फुल चार हाफ, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, गोला बेरीज, बाॅम्बे वेल्वेट, पोलीस लाईन, नवरा माझा नवसाचा या चित्रपटांत काम केले आहे. रंगभूमी आणि विविध सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणा-या प्रदीप पटवर्धन यांनी अखेरच्या क्षणी मात्र आपल्या चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. त्यांच्या जाण्याने रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्राचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.