श्रद्धा हत्याकांडानंतर साध्वी प्राची भडकल्या, ‘…आता आफताबचे 500 तुकडे करा’

मुंबईतील वसईची तरूणी श्रद्धा वालकर हिचा दिल्लीत तिच्या आफताब पुनावाला या प्रियकराने खून केला. इतकेच नाही तर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि त्याची विल्हेवाटही लावली. या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. अशातच विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी उत्तर प्रदेशातील बरेली येथे श्रद्धा हत्याकांडाबाबत मोठं विधान केले आहे.

काय म्हणाले साध्वी प्राची

हिंदूनो.. आता एकजूट व्हा आणि कान उघडं ठेवून ऐका.. त्यांना आता त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे. आफताबने श्रद्धाचे ३५ तुकडे केले, आता त्याचे ५०० तुकडे करा, असे आव्हान साध्वींनी केले आहे. पुढे त्या असेही म्हणाले, भारतात अत्यंत सुनियोजित षडयंत्र रचले जात आहे. इथे हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं जात आहे. लव्ह जिहादचा प्रयत्न होत आहे. अशा घटना फक्त हिंदू मुलींसोबतच का होतात? हिंदू मुलेही मुस्लिम मुलींशी लग्न करतात. मात्र, आत्तापर्यंत भारतात त्यांच्यासोबत अशी एकही घटना समोर आलेली नाही.

(हेही वाचा- BMC मध्ये टेंडर घोटाळा करणाऱ्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, दरेकरांचा घणाघात)

आमच्या मुलींचे रक्षण करण्यासाठी प्रसंगी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कारण, त्यांच्या आजूबाजूला कुठेतरी जिहादी आपल्या मुलीला त्यांच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रत्यत्न करेल, हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांशी मैत्री करू नये आणि प्रेमही करू नये, जर तुम्हाला प्रेमच करायचं असेल तर ते आपल्या पालकांवर करा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here