हमासने (Israel-Hamas Conflict) ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यादरम्यान त्यांनी ३ महिलांना ओलीस ठेवले होते. या महिलांचा व्हिडियो हमासने सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. या महिला झायनिस्ट कैदी असल्याचे हमासने म्हटले आहे. यातील एक महिलेने हमासच्या दबावाखाली येऊन महत्त्वाचे विधान केले आहे.
ओलीस ठेवण्यात आलेल्या तीन महिलांपैकी एका महिलेने इस्रायलकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर टीका केली आहे. ही टीका तिने हमासच्या दबावाखाली येऊन केली असल्याचे म्हटले जात आहे. या महिलेने दिलेली माहिती अशी की, हमासने प्राणघातक छाप्यादरम्यान सुमारे २४० लोकांना पकडले आणि सांगितले की, पकडलेल्या हजारो पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात त्यांची सुटका केली जाईल. हा व्हिडियो ७६ सेकंदांचा आहे. व्हिडियोतील महिलांची ओळख लगेच पटवणे शक्य नसून या महिला झायनिस्ट कैदी असल्याचे हमासचे म्हणणे आहे.