‘परदेश वारी’ची सुवर्णसंधी! फक्त २६ रूपयांत ‘हवाई’सफर; ‘या’ तारखेपर्यंतच भन्नाट ऑफर

114

देशात पेट्रोल-डिझेलचे दर इतके वाढले की, साधा जवळपासचा प्रवास करायचा म्हटलं तर किमान 50 ते 100 रूपये सहज खर्च होतात. पण जर केवळ 26 रूपयांमध्ये जर तुम्हाला परदेशवारी करण्याची संधी मिळाली तर… या महागाईच्या काळात 26 रुपयांत विमान प्रवास करण्याची संधी मिळाली तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. कारण तुम्ही प्रत्यक्षात फक्त 26 रुपयांत विमान प्रवासाचे तिकीट बुक करू शकतात. हे अतिश्योक्ती वाटत असलं तरी हे शक्य आहे. व्हिएतनामची एव्हिएशन कंपनी व्हिएतजेटने ही भन्नाट ऑफर आणली आहे. याअंतर्गत तुम्ही अगदी कमी खर्चात हवाई प्रवास करू शकतात.

(हेही वाचाः RBI New Rule: तुमच्याकडे ‘या’ नोटा आहेत का? असतील तर त्यांची किंमत ‘शून्य’!)

चीनी व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा होणाऱ्या डबल 7 फेस्टिव्हलच्या निमित्ताने व्हिएतजेटकडून ही ऑफर देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. या ऑफरमध्ये फक्त 26 रुपयांमध्ये हवाई प्रवास करता येणार आहे. व्हिएतनामची विमान वाहतूक कंपनी व्हिएतजेट गोल्डन वीक साजरा करत आहे. या निमित्ताने 7,77,777 उड्डाणांच्या तिकीटासह व्हिएतजेटने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या तिकिटांवर जबरदस्त सूट दिली आहे.

असे सांगितले जात आहे की, या ऑफर अंतर्गत 13 जुलै 2022 पर्यंत देशांतर्गत उड्डाणांसह आंतरराष्ट्रीय उड्डाणांची तिकीटं तुम्हाला बुक करता येणार आहे. या काळात बुक केलेल्या तिकिटांवर तुम्ही 15 ऑगस्ट 2022 ते 26 मार्च 2023 पर्यंत प्रवास करू शकतात. व्हिएतजेटनुसार, या तिकिटांची किंमत 7,700 व्हिएतनामी डोंग (VND) पासून सुरू होते. आता भारतीय चलनात बोलायचे झाले तर 7,700 डोंगची किंमत सुमारे 26.14 रुपये आहे.

या मार्गांवर व्हिएतजेटची उड्डाणं

व्हिएतजेट व्हिएतनाम आणि भारत दरम्यान चार उड्डाणे चालवते, ज्यामध्ये नवी दिल्ली/मुंबई ते हनोई आणि नवी दिल्ली/मुंबई ते हो ची मिन्ह सिटी यांचा समावेश आहे. या हवाई मार्गावर दर आठवड्याला तीन ते चार फ्लाइट्सची फ्रीक्वेंसी असते.

अशी खरेदी करा तिकिटे

व्हिएतजेट एअरलाइनच्या www.vietjetair.com या वेबसाइटवरून तुम्ही तिकीट खरेदी करू शकता. याशिवाय व्हिएतजेट एअरचे मोबाइल अॅप किंवा फेसबुक बुकिंग सेक्शन www.facebook.com/vietjetvietnam वरूनही तिकीट बुक करता येऊ शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.