टेनिसकोर्टसह अभिनयाचाही पडदा गाजवणारे Vijay Amritraj

२०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम आणि इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनद्वारे लंडनमधील टेनिसमधील योगदानाबद्दल Vijay Amritraj यांना सन्मानित करण्यात आले.

222
टेनिसकोर्टसह अभिनयाचाही पडदा गाजवणारे Vijay Amritraj
टेनिसकोर्टसह अभिनयाचाही पडदा गाजवणारे Vijay Amritraj

विजय अमृतराज (Vijay Amritraj) हे एक भारतीय क्रीडा समालोचक, अभिनेता आणि मद्रास येथील निवृत्त व्यावसायिक टेनिसपटू आहेत. १९८३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान देण्यात आला. २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम (International Tennis Hall of Fame) आणि इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन (International Tennis Federation) द्वारे लंडनमधील टेनिसमधील योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

१४ डिसेंबर १९५३ रोजी चेन्नई येथे विजय अमृतराज (Vijay Amritraj) यांचा जन्म झाला. त्यांनी १९७० मध्ये पहिली ग्रांप्री खेळली. १९७३ मध्ये त्यांनी विम्बल्डन जिंकले आणि यू.एस. ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले. १९८१ मध्ये देखील ते विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. मात्र तेव्हा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आपल्या टेनिसच्या कारकिर्दीसह त्यांनी अभिनय आणि क्रीडा समाचोलक म्हणून देखील काम केले आहे.

अमृतराज यांनी १९८३ च्या जेम्स बाँड (James Bond) चित्रपटातील ऑक्टोपसीमधील MI6 इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह विजय (Intelligence operative Vijay) ही भूमिका साकारली होती. ही त्यांची भूमिका चांगलीच गाजली. ते स्टार ट्रेक IV: द व्हॉयेज होम मध्ये अज्ञात स्टारशिप कॅप्टन म्हणून दिसले होते. त्याचबरोबर नाइन डेथ्स ऑफ द निंजा (Nine Deaths of the Ninja) आणि ऑफ गॉड ऍंड किंग्स (god and kings) या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी अभिनय केला आहे.

त्यांनी NBC TV series The Last Precinct आणि the Yakov Smirnoff comedy What a Country मध्ये देखील त्यांनी काम केले होते. त्याचबरोबर अनेक टिव्ही शोमध्ये पाहुणा कलाकार म्हणून देखील काम केले आहे. अमृतराज हे CNN-IBN वर Dimensions with Vijay Amritraj broadcast हा टॉक शो देखील होस्ट करतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.