श्रीनगर पोलीस ठाण्यात आत्महत्या केलेल्या अनिता भीमराव व्हावळ (34) या महिला पोलीस नाईकचे पती विजय झिने (38) याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. चारित्र्याच्या संशयावरुन पतीकडून तिचा छळ होत होता, अशी तक्रार भावाने श्रीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री दाखल केल्यानंतर, पोलिसांनी ही कारवाई केली.
महिला पोलीस नाईक अनिता आणि विजय यांचा विवाह 16 वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना 15 आणि 11 वर्षांच्या दोन मुली आहेत. मोठी दहावी तर धाकटी सहावीत शिकते. या दाम्पत्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून सतत भांडणे होत होती. अनेक वेळा नातेवाईकांनी मध्यस्थी करुन त्यांची भांडणे सोडवली होती. पती विजय हा नेहमीच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करत असे. तिला शिवीगाळ करुन मारहाणही करत असे. तिला तो मानसिक त्रास देत होता. आत्महत्येच्या आदल्या दिवशी रात्री त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
( हेही वाचा: मंत्री गुलाबराव पाटलांना उपसभापतींनी झापले, म्हणाल्या… )
गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी
याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा तपास नि: पक्षपाती होण्यासाठी तसेच पोलीस ठाण्यातच महिला पोलीस अंमलदाराचा मृत्यू झाल्यामुळे या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाकडे सोपवला आहे.
Join Our WhatsApp Community