विक्रम साराभाई (Vikram Sarabhai) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. ज्यांनी अंतराळ संशोधन सुरू केले आणि भारतात अणुऊर्जा विकसित करण्यास मदत केली. त्यांना “इंडियन स्पेस प्रोग्रामचे जनक” म्हणून ओळखले जाते. विक्रम साराभाई (Vikram Sarabhai) यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी गुजरातमध्ये झाला. त्यांचे वडील अंबालाल साराभाई हे उद्योजक असले तरी भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी त्यांचा संबंध होता.
विक्रम साराभाई (Vikram Sarabhai) यांनी १९४१ मध्ये शास्त्रीय नृत्यांगना मृणालिनी यांच्याशी विवाह केला. या जोडप्याला दोन मुले झाली. विक्रम साराभाई (Vikram Sarabhai) यांनी विज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. भौतिक संशोधन प्रयोगशाळेची स्थापना १९४७ मध्ये विक्रम साराभाई यांनी केली होती. ११ नोव्हेंबर १९४७ साली संस्थेची औपचारिक स्थापना एम.जी. विज्ञान संस्था, अहमदाबाद, येथे कर्मक्षेत्र एज्युकेशनल फाउंडेशन आणि अहमदाबाद एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने झाली.
(हेही वाचा – Fake Passport: भारतीय असल्याचा दावा करणारा बांगलादेशी नागरिकाला लखनऊ विमानतळावरून अटक )
कलापती रामकृष्ण रामनाथन हे संस्थेचे पहिले संचालक होते. कॉस्मिक रेय्ज आणि वरच्या वातावरणातील गुणधर्मांवर संशोधन करुन कार्याला सुरुवात झाली. नंतर अणुऊर्जा आयोगाच्या अनुदानाने सैद्धांतिक भौतिकशास्त्र आणि रेडिओ भौतिकशास्त्र या संशोधनांचा समावेश करण्यात आला. त्यांनी ऑपरेशन रिसर्च ग्रुप ही देशातील पहिली मार्केट रिसर्च संस्था स्थापन केली. अहमदाबादमधील नेहरू फाऊंडेशन फॉर डेव्हलपमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद, आणि अहमदाबाद टेक्सटाईल इंडस्ट्रीज रिसर्च असोसिएशन या अनेक संस्थांच्या स्थापनेत त्यांनी मोलाचा वाटा उचलला.
विक्रम साराभाई (Vikram Sarabhai) यांनी साराभाईंनी भारतीय उपग्रहाच्या निर्मिती आणि प्रक्षेपणासाठी एक प्रकल्प सुरू केला. त्यामुळे आर्यभट्ट नावाचा पहिला भारतीय उपग्रह १९७५ मध्ये रशियन कॉस्मोड्रोममधून कक्षेत ठेवण्यात आला. त्याचबरोबर साराभाई हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे संस्थापक होते. साराभाई यांना १९६६ मध्ये पद्मभूषण आणि १९७२ मध्ये मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community