कोल्हापूरातील मलकापूर येथे गावक-यांनी वन्यप्राण्यांची जंगलात जाऊन शिकार केल्याची घटना घडली. मांस खाण्यासाठी ही शिकार केल्याचे, प्रथमदर्शनी समजले. २ पिसुरी हरिण आणि २ रानससे यांचा मृतदेह तसेच सशाचे कापलेले मांस वनाधिका-यांनी शिका-यांकडून हस्तगत केले.
जंगलात शिकारी येणार असल्याची वनाधिका-यांना गुप्तमाहिती मिळाली होती. त्याआधारे गुरुवारी रात्री खोतवाडी जंगलातील मांडलाई देवी पठार येथील भागांत वनाधिका-यांनी दोन दिवस गस्त वाढवली होती. शुक्रवारी जंगलभागांतून गावाकडच्या दिशेने येणा-या दोन दुचाकीस्वारांना अडवताच त्यांच्याकडून २ पिसुरी हरिण आणि २ रानसशांचे मृतदेह आढळले. यासह दोन विनापरवाना गावठी बनावटीच्या बंदुका, १३ जिवंत काडतुसे, शिकारीसाठी वापरलेली ६ काडतुसे वनाधिका-यांनी जप्त केले. याचवेळी गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास अजून एक दुचाकी जंगलातून गावाकडे येताना वनाधिका-यांना आढळली.
( हेही वाचा :राज्यातील या जिल्ह्यांत सोमवारपासून ‘येलो अलर्ट’, मुंबईतही हलक्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता )
दंडाची तरतुद
भारतीय वन्यजीव संवर्धन कायद्यांतर्गत पिसुरी हरिण हे पहिल्या वर्गवारीत, तर रानससा चौथ्या वर्गवारीत संरक्षित आहे. पिसुरी हरिणाची शिकार केल्यास, दंडासह सात वर्षे सक्तमजुरीची आणि रानसशाच्या शिकारीप्रकरणी पंचवीस हजारांच्या दंडाची तरतूद आहे. वन्यजीवांच्या शिकारीची प्रकरणे आढळल्यास, १९२६ या वनविभागाच्या हेल्पाईन क्रमांकाकडे तक्रार करावी.
Join Our WhatsApp Community