विनायक मेटे अनंतात विलीन

134

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या पार्थिवाला बीड येथे शेतात अग्नी देण्यात आला. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मेटे यांचा रविवार, १४ ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या गंभीर अपघातात मृत्यू झाला. त्यांना अखेरचा निरोप देताना शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.

शेतात केले अंत्यसंस्कार 

विनायक मेटे अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर शोककाळा पसरली आहे. मेटे यांचे पार्थिव मुंबईवरून बीड शहरामध्ये रविवारी, १४ ऑगस्ट रोजी रात्री आणण्यात आले  आहे. त्यानंतर ते बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंत्यदर्शन झाल्यानंतर विनायक मेटे यांची अंत्ययात्रा अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असणाऱ्या विनायक मेटे यांच्या शेतात आणण्यात आले. तिथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यावेळी उपस्थित होते. तसेच यावेळी अनेक मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. विनायक मेटे यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी झाली होती.

(हेही वाचा तीन तासांत खात्मा करणार… अँटिलिया प्रकरणानंतर अंबानी कुटुंबाला पुन्हा धमकी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.