इंडिया ट्रान्‍सॅक्‍ट सर्विसेस लिमिटेडच्या व्‍यवस्‍थापकीय संचालकपदी Vinayak R. Goyal यांची नियुक्‍ती

105
इंडिया ट्रान्‍सॅक्‍ट सर्विसेस लिमिटेडच्या व्‍यवस्‍थापकीय संचालकपदी Vinayak R. Goyal यांची नियुक्‍ती

एजीएस ट्रान्‍सॅक्‍ट टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड (बीएसई: ५४३४५१ व एनएसई:) या बँका व कॉर्पोरेट क्‍लायंट्सना डिजिटल व रोख-आधारित सोल्‍यूशन्‍स देण्‍यासंदर्भात भारतातील सर्वात मोठ्या एकीकृत व ओम्‍नी-चॅनेल पेमेंट सोल्‍यूशन प्रदाता कंपनीने त्‍यांची पूर्णत: मालकीची उपकंपनी इंडिया ट्रान्‍सॅक्‍ट सर्विसेस लिमिटेड (आयटीएसएल) चे व्‍यवस्‍थापकीय संचालक म्‍हणून विनायक आर. गोयल यांच्‍या नियुक्‍तीची घोषणा केली आहे. आयटीएसएल डिजिटल पेमेंट सोल्‍यूशन्‍स देते. विनायक यांनी यापूर्वी ९ जून २०२१ ते १६ जून २०२४ या कालावधीदरम्‍यान आयटीएसएल येथे नॉन-एक्झिक्‍युटिव्‍ह व नॉन-इंडिपेण्‍डंट डायरेक्‍टर म्‍हणून काम केले आहे. (Vinayak R. Goyal)

विनायक आर. गोयल (Vinayak R. Goyal) २०२१ पासून एजीएस ट्रान्‍सॅक्‍ट टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडच्‍या संचालक मंडळावर कार्यकारी संचालक आहेत. त्‍यांनी कंपनीच्‍या डिजिटल पेमेंट व्‍यवसायासाठी विकास आराखडा विकसित करण्‍यामध्ये, ऑनगो ओपन-लूप प्रीपेड कार्डस् सारख्‍या उपक्रमांसह इशुअन्‍स व्‍यवसायाला चालना देण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्‍यांच्‍या मार्गदर्शनांतर्गत कंपनी सध्‍या ऑनगो अॅपमध्‍ये आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (AI)चा समावेश करण्‍याबाबत पायलट चाचणी करत आहे, ज्‍यामुळे विनासायास व्‍यवहारांसाठी त्‍यांच्‍या क्षमता वाढत आहेत. तसेच, विनायक ऑनगो अॅपअंतर्गत कॉन्‍टॅक्‍टलेस ओपन-लूप फ्यूएल पेमेंट सोल्‍यूशनच्‍या विकासावर देखरेख ठेवत आहेत. याव्‍यतिरिक्‍त, त्‍यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत कंपनीने प्रीपेड व्‍यवसायामध्‍ये धोरणात्‍मक सहयोगांच्‍या माध्‍यमातून मोठी प्रगती केली आहे. (Vinayak R. Goyal)

(हेही वाचा – Yog Din 2024: मोदींनी परिधान केलेल्या ‘गमछा’कडे नेटकरी आकर्षित! काय आहे वैशिष्ट्य?)

या नियुक्‍तीबाबत मत व्‍यक्‍त करत एजीएस ट्रान्‍सॅक्‍ट टेक्‍नॉलॉजीजचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक रवी बी गोयल म्‍हणाले, ”विनायक यांच्‍या नियुक्‍तीसह आमची नेतृत्‍व टीम प्रबळ करण्‍याप्रती, तसेच झपाट्याने विकसित होत असलेल्‍या डिजिटल पेमेंट क्षेत्रात शाश्‍वत विकासाला चालना देण्‍याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. आधुनिक पिढीचे प्रतिनिधी म्‍हणून विनायक आमच्‍या डिजिटल पेमेंट धोरणामध्‍ये अद्वितीय व नाविन्‍यपूर्ण दृष्टिकोन घेऊन येतात. मला विश्‍वास आहे की त्‍यांचे नेतृत्‍व महत्त्वाचे ठरेल, जेथे आम्‍ही ग्राहकांना उत्तम सेवा देण्‍यासाठी आमच्‍या डिजिटल पेमेंट सोल्‍यूशन्‍समध्‍ये वाढ करण्‍यासोबत आमच्‍या ऑफरिंग्‍जमध्‍ये वाढ करत राहू.” (Vinayak R. Goyal)

इंडिया ट्रान्‍सॅक्‍ट सर्विसेस लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक विनायक आर गोयल (Vinayak R. Goyal) म्‍हणाले, ”या भूमिकेमध्‍ये सामील होत मला आमच्‍या डिजिटल पेमेंट्स व्‍यवसायाला नाविन्‍यता व विकासाच्‍या नवीन युगामध्‍ये पुढे घेऊन जाण्‍यास नेतृत्‍व करण्‍याचा अभिमान वाटतो. आमच्‍या अपवादात्‍मक टीमसोबत सहयोगाने आम्‍ही क्षेत्रांमधील ग्राहकांना विनासायास अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करत डिजिटल व्‍यवहारांच्‍या भविष्‍याला आकार देण्‍यास समर्पित आहोत.” विनायक आर गोयल यांना बिझनेस स्‍ट्रॅटेजी, इन्‍व्‍हेस्‍टमेंट बँकिंग आणि फंड रेजिंग अशा क्षेत्रांमध्‍ये एकूण ९ वर्षांहून अधिक काळाचा कामाचा अनुभव आहे. त्‍यांनी यापूर्वी अॅव्‍हेण्‍डस कॅपिटल प्रायव्‍हेट लिमिटेडमध्‍ये अॅनालिस्‍ट म्‍हणून काम केले आहे. त्‍यांनी पर्ड्यू युनिव्‍हर्सिटी, यूएसएमधून पदवी प्राप्‍त केली आहे. (Vinayak R. Goyal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.