Vinoo Mankad यांनी केल्या होत्या २३१ धावा; त्यांच्या यशस्वी कारकीर्दीची एक झलक!

40
Vinoo Mankad यांनी केल्या होत्या २३१ धावा; त्यांच्या यशस्वी कारकीर्दीची एक झलक!

विनू मांकड (Vinoo Mankad) यांचे पूर्ण नाव मूलवंतराय हिम्मतलाल मांकड असे होते. हे भारतातील महान अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी एक होते. १२ एप्रिल १९१७ रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी १९४६ ते १९५९ दरम्यान भारतासाठी ४४ कसोटी सामने खेळले आहेत. क्रिकेटमध्ये त्यांनी अगदी भरीव कामगिरी करुन ठेवली आहे. आज आपण त्यांच्या कारकिर्दीची आढावा घेणार आहोत.

(हेही वाचा – महाराष्ट्रासाठी 1 लाख 73 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी; रेल्वेमंत्री Ashwini Vaishnaw यांची माहिती)

विनू मांकड (Vinoo Mankad) हे उजव्या हाताचे फलंदाज आणि डाव्या हाताचे स्लो ऑर्थोडॉक्स गोलंदाज होते. त्यांनी ३१.४७ च्या सरासरीने २,१०९ कसोटी धावा केल्या, ज्यात पाच शतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांनी ३२.३२ च्या सरासरीने १६२ कसोटी विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये आठ वेळा पाच विकेट्स घेतल्या. १९५६ मध्ये पंकज रॉयसोबत ४१३ धावांची विश्वविक्रमी सलामी भागीदारी केली. पुढील ५२ वर्षे हा रेकॉर्ड कायम राहिला. ही त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती.

(हेही वाचा – मुंबईतील विहीर मालकांना BMC कडून बजावण्यात आलेल्या सूचनापत्रांना येत्या १५ जून २०२५ पर्यंत स्थगिती)

मांकड (Vinoo Mankad) मुंबई, गुजरात, बंगाल आणि राजस्थानसह अनेक स्थानिक संघांसाठी खेळले. १९५६ मध्ये न्यूझीलंडविरुद्धची त्यांची २३१ धावांची खेळी ही त्यावेळी एका भारतीयाने केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. त्या काळी भारतीय संघाला त्यांनी ग्लॅमर मिळवून दिले. “मांकडिंग” हा शब्द त्यांच्या नावावरुन घेण्यात आला आहे, जेव्हा १९४७-४८ च्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नॉन-स्ट्रायकर एंडवर खूप दूर गेल्यामुळे बिल ब्राउनला धावबाद केले होते. ही त्यांच्या आयुष्यातली मोठी उपलब्धी म्हणता येईल. जून २०२१ मध्ये आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. भारतीय अंडर-१९ देशांतर्गत स्पर्धा, विनू मांकड ट्रॉफी, त्यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आली आहे. भारतीय क्रिकेटमधील त्यांचे योगदान आजही प्रसिद्ध आहे. क्रिकेट रणनीतींबद्दलच्या चर्चेत त्यांचे नाव घेतले जाते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.