ई-चलन वसुली ठरतंय पोलिसांच्या डोक्याला ताप!

170

बेशिस्त पार्क होणाऱ्या वाहनांना आवर घालण्यासाठी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून ‘ई-चलन’पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दंड वसुली केली जात आहे. पोलिसांच्या नोट‌ीसकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनमालकास थेट न्यायालयाची पायरी चढावी लागत आहे. दरम्यान, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चलनाद्वारे दंड आकारला जातो. मात्र आता हेच ई-चलन वसुली पोलिसांच्या डोक्याला ताप ठरताना दिसतंय.

ई-चलन मिळत नसल्याने गैरफायदा

मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनी ई-चलनद्वारे दंड भरण्याकडे पाठ फिरवली आहे. २ महिन्यात ५,६७,३९९ ई-चलनच्या ३७ कोटी ४५ लाख १२ हजार ६०० रु. थकबाकी असून ई-चलन वसुली पोलिसासाठी ताप ठरत असल्याचे सांगितले जात आहे. ई-चलनाचा गैरफायदा ई-चलन हे गाडीच्या रजिस्ट्रेशनवेळी देण्यात आलेल्या मोबाइल नंबरवर पाठवले जाते. पण, ग्राहकांचे मोबाईल नंबर नंतर बदलतात. ते अपडेट होत नाहीत, पर्यायाने त्यांना त्यांच्या गाडीवर जनरेट झालेले ई-चलन मिळत नाही. याचा अनेकजण गैरफायदाही घेतात.

(हेही वाचा – कोळी बांधवांच्या विरोधामुळे धारावीतील पंपिंग स्टेशनची जागा बदलली)

लोकअदालतमध्ये हजर राहण्याची नोटीस

काही जणांच्या नावावर एकापेक्षा जास्त गाड्या असतात, त्यातल्या काही गाड्यांवर सतत नियम तोडल्यामुळे दंडाची मोठी रक्कम भरायची बाकी असते. ज्या व्यक्तींनी वारंवार मेसेज पाठवूनही ई-चलनची मोठी रक्कम भरली नाही, अशा डिफॉल्टर्सना लोकअदालतमध्ये हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.