पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता जवळ असलेल्या हावडा शहरात संचारबंदी असूनही शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी याभागात हिंसाचार झाला. यावेळी झालेल्या दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान खबरदारी म्हणून या परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
इंटरनेट सेवा बंद
हावडा शहरातील बाजार परिसरात शनिवारी पहाटे रस्त्यावर उतरलेल्या शेकडो मुस्लिम तरुणांनी जाळपोळ, तोडफोड आणि दुकाने लुटण्यास सुरुवात केली. घटनास्थळी तैनात असलेल्या पोलीस पथकाला घेराव घालून सर्व बाजूंनी दगडफेक करण्यात आली. यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या मात्र तरीही हिंसाचार थांबवता आला नाही.
( हेही वाचा : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहायलय पाहिलंय का तुम्ही?)
या संदर्भातील व्हायर व्हिडीओमध्ये मुस्लिम लोक पोलिसांवर दगडफेक करत असल्याचे दिसून येते. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात हा हिंसाचार केला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये गुरुवारपासून मुस्लिमांचे हिंसक आंदोलन सुरू आहे. यावर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये उग्र निदर्शने करू नयेत, असा इशारा दिला होता, मात्र त्यानंतरही शुक्रवारी हावडा आणि कोलकात्याच्या विविध भागात दिवसभर हिंसाचार, जाळपोळ, तोडफोड, लुटमार आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. हावडाच्या अनेक भागात पोलिसांवर हँन्डग्रेनेड फेकण्यात आले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी जाहीर केली. आता संपूर्ण जिल्ह्यात 13 जूनपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community