सांगली जिल्ह्यच्या जत तालुक्यातील तिघेजण ओमान देशात समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याची दुर्देवी घटना रविवारी दुपारी घडली आहे. सांगली जिल्ह्यातील जत शहरातील परिचित वकील राजकुमार म्हमाणे यांचे मोठे बंधू व त्यांची दोन मुलं ओमान देशातील एका समुद्रकिनारी फिरायला गेले असता लाटेत वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ओमानच्या समुद्रात वाहून गेलेले एकाच कुटुंबातील तिघे सांगलीचे!#oman #sangli #watercrisis #rainfall #rain #heavyrain #HindusthanPostM #HindusthanPostH pic.twitter.com/PC9J1SoVRA
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) July 13, 2022
या घटनेत जत येथील शशिकांत म्हमाणे, त्यांची नऊ वर्षांची मुलगी श्रुती आणि सहा वर्षांचा मुलगा श्रेयस हे समुद्राच्या लाटेत वाहून गेले आहेत. अद्याप समुद्रात त्यांचा शोध लागलेला नाही. मूळचे जत येथील शशिकांत म्हमाणे हे मागील अनेक वर्षांपासून दुबई येथील एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते.
(हेही वाचा – पवारांनी मुंबई मनपा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले! म्हणाले “कुणी सोबत…”)
पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती आणि अन्य एक मुलगी यांच्यासह दुबई येथे राहण्यास होते. बकरी ईदमुळे सुट्टी असल्याने शशिकांत, पत्नी, मुले आणि मित्रांसह दुबई जवळ असलेल्या ओमान या देशात फिरायला गेले होते. यावेळी ही दुर्घटना घडली.
Join Our WhatsApp Community