जागतिक पातळीवर मुस्लिम समाज गैरमुस्लिमांना त्रास देत आहे. भारतात (Vishwa Hindu Parishad) हिंदू शत्रू असेल तर पाश्चात्य जगात ख्रिश्चन आणि ज्यु त्यांच्या साठी शत्रू. हमासने गेल्या काही दिवसांत जो काही अत्याचार, नरसंहार चालवला आहे तो मानवतेला काळिमा फासणारा आहे. विश्व हिंदू परिषद इस्रायलच्या पाठीशी उभे आहे. जोपर्यंत एक एक जिहादी ठेचत नाही तोवर आपले अभियान थांबवू नका असे आवाहन आम्ही परिषदेच्या वतीने इस्रायलला करत आहोत. हमासला नेस्तनाबूत केल्याशिवाय थांबू नका, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन (Vishwa Hindu Parishad) यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष व विश्व हिंदू परिषदेचेही हिरक महोत्सवी वर्ष या निमित्त बजरंग दलाच्या वतीने सिंधुदुर्ग ते मुंबई अशा शिवशौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
दादर येथील राजा बढे चौक येथे संपन्न झालेल्या (Vishwa Hindu Parishad) या कार्यक्रमास जैन यांच्यासह महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज, अभिनेते राहूल सोलापूरकर, ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत, लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) मनोजकुमार सिन्हा, लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) जगदीप सिंह मनचंदा भजनसम्राट अनुप जलोटा, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आदी मान्यवर उपस्थित होते. बजरंग दलाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
सुरेश जैन (Vishwa Hindu Parishad) पुढे म्हणाले, काही लोक आज हमासचे समर्थन करत आहेत. हमासचे समर्थन करून मुस्लिम मतपेटी गोळा करण्याचा प्रयत्न करणारे उद्या पाकिस्तानचेही समर्थन करू शकतील. अशा नृशंसतेचे समर्थन कसे होऊ शकते? जगभरातील मुस्लिम समाज हमासच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने उभा आहे हे दुर्दैवी आहे. एकच कार्यपद्धती, मोडस ऑपरेंडी शतकानुशतके वापरली जात आहे. स्त्रियांवरील अत्याचार, मंदिरे उध्वस्त करणे हे प्रकार मागील १४०० वर्षे होत आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन अनुकरणीय आहेच. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरणही करणे आवश्यक आहे. त्यांनी औरंगजेबाशी १२५ लढाया केल्या व जिंकत आले. औरंगजेबाने धोका देऊन त्यांना पकडले, अनन्वित अत्याचार केला. पण संभाजी महाराजांनी धर्मांतर नाही केले. म्हणूनच त्यांचा धर्मवीर म्हणून गौरव केला जातो.
(हेही वाचा – Mahalakshmi Mandir : महालक्ष्मी मंदिरात पोहोचण्यासाठी आता अतिरिक्त पादचारी मार्ग)
नवरात्रीच्या काळात जिहादी (Vishwa Hindu Parishad) वृत्तीची माणसे गरबा कार्यक्रमात शिरून स्त्रियांना लक्ष्य करतात व या माध्यमातून लव्ह जिहाद करण्याचा प्रयत्न करतात. गरबा खेळण्यासाठी येणाऱ्यांची आधार कार्ड तपासा, त्यांना कपाळी टिळा लावा व हातात कलावा (रक्षासूत्र) बांधा. देवीची, दुर्गादेवीची भक्ती न करणारी एकही व्यक्ती मंडपात शिरू नये ही तुमची जबाबदारी आहे, असे आवाहन नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर डॉ. जैन यांनी केले.
हिंदुधर्मरक्षणात बजरंग दलाचा (Bajrang Dal) मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या संघर्षाचेच प्रतीक म्हणून बाबरी ढाचाच्या जागी आज पुन्हा भव्य राममंदिर साकारत आहे. काही वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी घोषणा केली होती, अमरनाथ यात्रेकरूंनी आपण परत येणार नाही हे घरी सांगूनच यात्रेला यावे. बजरंग दलाने या आगळिकीला सडेतोड उत्तर दिले. एक लाख बजरंग दलाचे कार्यकर्ते एकजुटीने अमरनाथ यात्रेला पोहोचले. ही संख्या पाहून हबकलेला शत्रू दहशत सोडून यात्रेकरूंच्या स्वागताकरिता उभा होता. कोरोनाच्या काळात बजरंग दलाच्या वतीने मोठ्या प्रमाणात सेवा कार्य करण्यात आले. अन्न, औषधे, रेशन अशा विविध सेवा जनतेपर्यंत पोहोचवण्यात आल्या. समाजात दहशत पसरवणारे जेव्हा कोरोनाच्या दहशतीने घरात लपून बसले होते तेव्हा संघाचे आणि बजरंगदलाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात सेवाकार्य करीत होते, अशी माहितीही सुरेश जैन (Vishwa Hindu Parishad) यांनी यावेळी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community