विवान सुंदरम (Vivaan Sundaram) हे एक कंटेम्पररी आर्टिस्ट होते. ते शिल्पकार, चित्रकार, फोटोग्राफर प्रिंटमेकर, इन्स्टलेटर आणि व्हिडिओ मेकर म्हणून काम करायचे. त्यांच्या कामांमध्ये राजकीय जागरूकता दिसून यायची. त्यांच्या कामांचे विषय लोकप्रिय संस्कृती, सामाजिक समस्या, वेगवेगळ्या स्मृती, ओळख आणि इतिहास यांच्या संदर्भात असायचे. त्यांनी आर्ट हिस्टोरीयन आणि क्रिटिक्स म्हणजेच समीक्षक गीता कपूर यांच्याशी लग्न केलं होतं.
(हेही वाचा – IPL 2024, RR bt DC : वेदनाशामक गोळ्या खाऊन खेळला पण, ठरला ‘मॅचविनर’)
लंडन येथे शिक्षण
विवान सुंदरम यांचा जन्म १९४३ साली शिमला हिल स्टेट्स येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव कल्याण सुंदरम असं होतं. विवान सुंदरम यांचं शिक्षण डून स्कूल येथे झालं. तिथे त्यांना डूनचे पहिले आर्ट्स टीचर आणि बंगाल स्कूल ऑफ आर्ट्सचे पेंटर सुधीर खास्तगीर यांच्याकडून मूळ शिक्षण घेता आलं. त्यानंतर ते बडोदा येथील महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीमध्ये फाईन आर्ट्स फॅकल्टीकडे वळले. मग ते १९६६ ते १९६८ सालादरम्यान लंडन येथील स्लेड स्कूलमध्ये गेले.
तिथे त्यांनी सिनेमाच्या इतिहासाचा संपूर्ण अभ्यास केला. तिथे १९६८ साली विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात त्यांनी सक्रियपणे आपला सहभाग नोंदवला. आणीबाणीच्या काळात ते लंडनमध्ये होते. त्यांनी ब्रिटिश अमेरिकन पेंटर आर. बी. किताज यांची भेट घेतली. त्यांच्याकडे त्यांनी काही काळ प्रशिक्षणसुद्धा घेतलं. विवान सुंदरम हे १९७१ साली भारतात परत आले.
भारतात आल्यानंतर विवान यांनी वेगवेगळ्या आर्टिस्टचे ग्रुप्स आणि ऑर्गनायझेशन्स सोबत काम केलं. २९ मार्च २०२३ रोजी विवान सुंदरम (Vivaan Sundaram) यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. त्यावेळी ते ७९ वर्षांचे होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community