व्लादिमिर पुतिन यांना कर्करोगाचा गंभीर आजार!

97

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे सध्या प्रकृतीच्या विषयावर चर्चेत आले आहेत. रशियाचे युक्रेनविरोधातील युद्ध संपता संपत नाही. अशातच रशिया आता युद्धाची व्याप्ती वाढवण्याच्या तयारीत आहे. अशा वेळी रशियाला जबरदस्त धक्का बसणारी घटना समोर आली आहे. व्लादिमिर पुतिन सध्या कर्करोगाच्या आजाराने गंभीर आजारी आहेत.

युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी कॅन्सरशी संबंधित शस्त्रक्रिया

आता ब्रिटनचे माजी गुप्तहेर ख्रिस्तोफर स्टील यांनी पुतिन यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे गंभीर आजारी असल्याचा दावा ख्रिस्तोफर स्टील यांनी केला आहे. दरम्यान ख्रिस्तोफर स्टील यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एक डोजियर लिहिले होते आणि 2016 च्या अमेरिका निवडणूक प्रचारात रशियाच्या हस्तक्षेपाचा आरोप केला होता. लीक झालेल्या ऑडिओ टेपच्या चर्चेलाही आता वेग आला आहे. ज्यामध्ये व्लादिमीर पुतिन यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या एका व्यक्तीनेही ते ब्लड कॅन्सरने ग्रस्त असल्याचे सांगितले आहे. हा व्यक्ती पाश्चात्य भांडवलदारांसोबत व्लादिमीर पुतिन यांच्या तब्येतीविषयी चर्चा करताना ऐकला होता. हे लीक झालेले ऑडिओ रेकॉर्डिंग न्यू लाईन्स या अमेरिकन मासिकाच्या हाती लागले आहे. याचबरोबर लीक झालेल्या ऑडिओ टेप्सचा हवाला देत व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा आदेश देण्यापूर्वी काही वेळापूर्वी त्यांच्या पाठीवर ब्लड कॅन्सरशी संबंधित शस्त्रक्रिया केली होती. तसेच व्लादिमीर पुतिन हे वेडे झाले आहेत, असेही त्यात म्हटले आहे.

(हेही वाचा शिवसंपर्क नाही, तर शिव्यासंपर्क! फेरीवाल्यांना आणून सभेला बसवलेले! नारायण राणेंचा घणाघात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.