चार महानगरपालिकेतील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबरला मतदान

धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

7 डिसेंबरला नामनिर्देशनपत्रांची छाननी

मदान यांनी सांगितले की, या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. नामनिर्देशनपत्रे 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत स्वीकारले जातील. 5 डिसेंबर 2021 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 7 डिसेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे.

(हेही वाचा – ओ वुमनिया! ‘या’ चार शहरात उघडणार लेडीज स्पेशल वाईन शॉप!)

22 डिसेंबरला होणार मतमोजणी 

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2021 पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 10 डिसेंबर 2021 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 22 डिसेंबर 2021 रोजी करण्यात येणार आहे.

महानगरपालिकानिहाय रिक्तपदे अशी

  • धुळे- 5ब
  • अहमदनगर- 9क
  • नांदेड वाघाळा- 13अ
  • सांगली मिरज कुपवाड- 16अ

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here