तब्बल ३ वर्षांपासून एसटी कर्मचारी नियुक्तीच्या प्रतिक्षेत!

112

अमरावती परिवहन विभागात विविध पदासाठी एसटी कर्मचाऱ्यांची सरळसेवा भरती झाली होती. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण देखील झाले. मात्र गेल्या तीन वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्यांनी अमरावती विभाग परिवहन विभागात धडक देत विभागिय परिवहन अधिकारी श्रीकांत गभने यांना जाब विचारला.

(हेही वाचा – एसटी कर्मचारी आंदोलनात अफवांचा ‘पूर’ आणि बदलत गेला आंदोलनाचा ‘सूर’ )

आत्महत्येशिवाय पर्याय नाही, कर्मचाऱ्यांची भावना

सध्या राज्यभरात एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर आहेत. या काळात परिवहन विभागाने कंत्राटी पद्धतीने चालक वाहक नेमले. मात्र २०१९ ला झालेल्या सरळ सेवा भरतीतील कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिली नाही. त्यामुळे सरकारने याचा विचार केला पाहिजे. कारण आता तीन वर्षे उलटून गेली. त्यामुळे आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशी भावना कर्मचाऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली.

प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविला

आपण या सर्व कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविला आहे. मात्र मध्यवर्ती कार्यालयाकडून कुठल्याही प्रकराची मंजुरी आलेली नाही. सध्या जे कामगार कामावर आहेत ते आपण कंत्राटदारामार्फत घेतलेले आहे. तशी जाहिरात निघाली होती त्यांना मध्यवर्ती कार्यालयाकडून पत्र मिळाले आहे. नियुक्ती प्रतीक्षेत असलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्या नावाचे पत्र आले तर आपण त्यांनाही सामावून घेऊ, अशी प्रतिक्रिया विभाग प्रमुख श्रीकांत गभणे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.