आता Paytm सांगणार ट्रेनच्या Live स्टेटससह कोणत्या Platform येणार तुमची गाडी?

73

डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएम अॅपने एका नव्या अपडेटची घोषणा केली आहे. पेटीएम कंपनीकडून ट्रेनच्या लाईव्ह लोकेशनसह ती ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मला येणार याबाबतच एक नवं फीचर आल्याचे सांगण्यात येत आहे. तर या नव्या फीचरद्वारे युजर्स ट्रेनचं Live Status जाणून घेऊ शकतात. तसेच ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार हेही पेटीएमद्वारे जाणून घेता येणार आहे, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. पेटीएमकडून देण्यात आलेले हे नवे फीचर प्रवाशांना अतिशय महत्त्वपूर्ण आणि लाभदायी ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – Indian Railway: आता चालत्या ट्रेनमध्ये मोटरमनला डुलकी लागली तरी नो टेन्शन! कारण…)

पेटीएमकडून देण्यात सुविधांद्वारे जर तुम्हाला जास्त डिटेल्स जाणून घेता येत नसेल तर तुम्ही IRCTC च्या वेबसाईटद्वारे ट्रेनचे लाईव्ह लोकेशन आणि स्टेटस पाहू शकतात. पेटीएमच्या या फीचरद्वारे ट्रेनचे लाईव्ह लोकेशन चेक करता येण्याच्या या नव्या अपडेटसह पेटीएम युजर्स ट्रेनचे तिकीट बुकिंग करू शकतात आणि ते करण्यापूर्वी त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे कोणती याची माहिती देखील तुम्ही या अॅपद्वारे शोधू शकतात, असेही कंपनीद्वारे सांगण्यात आले आहे.

पेटीएमद्वारे या मिळतात सुविधा

  • जे युजर्स पेटीएम अॅप्लिकेशनचा वापर करतात ते आता ट्रेनचे तिकीटही बूक करू शकतात.
  • पीएनआर आणि ट्रेन स्टेटसही चेक करू शकतात.
  • जेवणही ऑर्डर करू शकतात
  • 24×7 कस्टमर सपोर्टचा फायदा घेऊ शकतात
  • या अॅपच्या माध्यमातून युजर्स हिंदी, बंगाली, मराठी, तेलगु, तामिळ, गुजराती, कन्नड, मल्याळम, पंजाबी, ओडिया आणि इतर भाषांमध्येही तिकीट बूक करू शकतात.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.