Water Cut : आज ‘या’ विभागात येणार नाही पाणी

226

के पश्चिम विभाग हद्दीमध्ये, अंधेरी (पश्चिम) येथील आदर्श नगर रस्ता, ट्विंकल अपार्टमेंटसमोर १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बुधवारी २३ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास फुटली. ही जलवाहिनी फुटल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागल्याचे कळताच महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याच्या अधिकारी, कर्मचा-यांनी व विभाग कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेतले.

या दुरुस्तीच्या कामामुळे मिल्लत नगर, एसव्हीपी नगर म्हाडा आणि लोखंडवाला परिसरात बुधवारी पाणीपुरवठा होणार नसल्याचे जल अभियंता विभागाने कळवले आहे. या जलवाहिनीतून होणारा पुरवठा बंद करुन पाणी गळती थांबवण्यात आली. तसेच जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम देखील तातडीने सुरु करण्यात आले असल्याचे जलाभियंता विभागाने कळवले आहे. ही दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत मिल्लत नगर, एसव्हीपी नगर म्हाडा आणि लोखंडवाला परिसरात बुधवारी पाणीपुरवठा होवू शकणार नाही. नागरिकांच्या गैरसोयीबद्दल महानगरपालिका प्रशासन दिलगीर आहे.

(हेही वाचा Chandrayaan – 3 वर अमेरिका ‘असे’ ठेवणार लक्ष)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.