पश्चिम उपनगरातील ‘या’ विभागात गुरुवारी पाणीकपात

190
Water cut on Thursday in this section of western suburbs
पश्चिम उपनगरातील 'या' विभागात गुरुवारी पाणीकपात
माहीम खाडी पुलाच्या विस्तारिकरणाच्या कामात येणाऱ्या ९०० मिलीमीटर रिक्लेमेशन इनलेट वळविण्याचे काम गुरुवारी ४ मे २०२३ रोजी हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे वांद्रे पश्चिम आणि खार पश्चिमसह संपूर्ण ‘एच पश्चिम’ विभाग परिसरात गुरुवारी ४ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून शुक्रवारी ५ मे २०२३ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
तरी या परिसरातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.