आरेतील फिल्मसिटीतील साईबंगोडा या अवैधरित्या दारू बनवणाऱ्या अवैध झोपड्यांमधील 350 लोकांनी चक्क विहार तलावाची जलवाहिनी फोडून दारू तयार करण्यासाठी वापरली. हा प्रकार अतिक्रमण तोडताना वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आला. गेल्या आठवड्याच्या अखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी परीक्षेत्रातील अतिक्रमणावर हातोडा टाकत 25.50 हेक्टर जंगल पुन्हा ताब्यात मिळवले. साईबंगोडा या अतिक्रमण भागात गेली कित्येक वर्ष अवैधरित्या दारू बनवण्याचे काम सुरु होते. त्यासाठी चक्क विहार तलावाची पाईपलाईन फोडल्याचे कारवाई दरम्यान वनाधिकाऱ्यांना आढळले. पाईपलाईन फोडून मोठ्या वेगाने बाहेर फेकले जाणारे पाणी दारूच्या निर्मितीसाठी वापरले जायचे. या फुटलेल्या जलवाहिनीतून दारू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तब्ब्ल 20 टाक्या वनाधिकाऱ्यांना सापडल्या. एका ठिकाणी सिमेंटचे पक्के बांधकामही जेसीबीच्या माध्यमातून तोडण्यात आले आहे.
( हेही वाचा: शिवसेनेने फिरवली ‘पाठ’, भाजप देणार राजेंना ‘साथ’? )
स्पेशल प्रोटेक्शन फोर्स घेणार अतिक्रमणमुक्त जमिनीची काळजी
साईबंगोडा, उलटणपाडा, मरोशीपाडा या भागातून 25.50 हेक्टर जमीन अतिक्रमणातून मुक्त केल्यानंतर, या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून वनविभागाच्या स्पेशल प्रोटेक्शन फोर्सचे 6 अधिकारी तब्ब्ल नऊ महिने पहारा देणार आहेत, अशी माहिती अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (पश्चिम विभाग ) वन्यजीव डॉ. व्ही क्लेमेंट बेन यांनी दिली.
Join Our WhatsApp Community