पाणी जपून वापरा! मुंबईतील ‘या’ भागात दोन दिवस पाणी कपात

113

पवई उच्च स्तरीय जलाशय या टाकीचे निरिक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याचे काम बुधवार ०५/०१/२०२२ रोजी हाती घेण्यात येत आहे. या कामासाठी संपूर्ण टाकी पूर्णपणे रिकामी करून स्थळ पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे ५ व ६ जानेवारी रोजी कुर्ला परिसराला पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

या प्रभागांमध्ये पडणार प्रभाव

(प्रभाग क्र. १६० (अंशतः), १६२ (अंशतः), १६३, १६४, १६५, १६६, १६७, १६८, १७१ (अंशतः)

(हेही वाचा – छानछोकीसाठी ती दोन मुले करत होती ‘हे’ काम! वाचून थक्क व्हाल)

या वस्त्यांना होणार कमी दाबाने पाणी पुरवठा

  • गुरुनानक नगर,
  • गईबन शाह दर्गा रोड,
  • सलमा कॅम्पइंड न.स.स रोड ,
  • एल.बी.एस मार्ग,
  • छत्रपती शिवाजी टर्मिनल मार्ग, विनोबा भावे नगर,
  • ब्रह्म वाडी, स्टेशन रोड,
  • न्यू मिल रोड, कपाडिया नगर,
  • बेलग्राम रोड, टॅक्सी मेन कॉलनी,
  • मॅच फॅक्टरी लेन,
  • सुभाष नगर,
  • हरियानावला लेन,
  • इंद्रनागर अँड सारवेश्वर मंदिर मार्ग आणि तकीया वॉर्ड,
  • शास्त्रीनगर,
  • पूर्ण काजूपाडा,
  • सुंदरबाग कमानी,
  • नौपाडा,
  • राजू बडेकर मार्ग,
  • एम .एन रोड,
  • प्रीमियर रोड,
  • कालेमार्ग ते ब्राम्हण वाडी,
  • कोहिनूर सिटी,
  • विनोभा भावे नगर,
  • हलाव पूल,
  • परीघखाडी चुनाभट्टी पंपिंग.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.