एका उंदरामुळे संपूर्ण औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा झाला खंडित; नेमकं काय घडलं?

93

औरंगाबादमध्ये आधीच पाण्याची कमतरता आहे. तिकडे चार ते पाच दिवसाला पाणी येते. त्यातच आता एका उंदरामुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा 11 तासांसाठी बंद पडला होता. त्यानंतर आता औरंगाबादकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

नेमकं घडलं काय?

सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास जायकवाडी पंपगृहातील पंप क्रमांक 4 च्या फिडरमध्ये अचानक एक उंदीर घुसला. त्याने घातलेल्या गोंधळानंतर शाॅर्टसर्किट होऊन ट्रान्सफाॅर्मर खराब झाले. याबाबत माहिती मिळताच महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र या संपूर्ण दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल 13 तास लागले. त्यामुळे या काळात शहरात थेंबभर सुद्धा पाणी आले नाही.

( हेही वाचा:IRCTC Booking : आता चॅटबॉटद्वारे करता येणार रेल्वे तिकिटांचे बुकिंग )

नागरिकांना मनस्ताप 

या घटनेमुळे जायकवाडी धरणातून येणारी पाणी पुरवठा योजना तब्बल 13 तास बंद होती. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. नागरिकांना एक ते दोन दिवस उशिरा पाणी येणार आहे. आधीच पाच ते सहा दिवसांनी येणारे पाणी आणखी दोन दिवसांनी वाढल्याने, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकीकडे जायकवाडी धरण 100 टक्के भरले आहे. मात्र तरीही औरंगाबादकरांना पिण्याचे पाणी काही मात्र वेळेवर मिळत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.