‘या’ भागात राहणार २४ तास पाणी पुरवठा बंद!

115

ठाणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या ‘स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन’ कंपनीच्यावतीने माणकोली एम.बी.आर येथे स्टेमच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती काढण्यात येणार असल्याने ‘झोनिंग’ पद्धतीने पाणी पुरवले जाणार आहे, यासाठी बुधवार ३० मार्च रोजी शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी २४ तास स्टेम प्राधिकरणामार्फत ठाणे महानगरपालिकला होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा होणार

बहुतांशी ठाणेकरांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड कायम आहे. सद्यःस्थितीत जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच ‘व्हॉल्व’ बदलण्याच्या कामासाठी ‘शटडाऊन’ घेतल्याने अनेकदा पाणीपुरवठा २४ तास बंद ठेवला जातो. आठवड्यातील प्रत्येक बुधवार तर निर्जळीचा वार असतो. आताही स्टेमच्या जलवाहिनीची गळती काढण्यासाठी बुधवार ३० मार्च रोजी सकाळी ९ ते गुरुवार ३१ मार्च सकाळी ९ वाजेपर्यंत स्टेम प्राधिकरणामार्फत ठाणे महानगरपालिकेला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी, ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील उपलब्ध पाणीपुरवठा ‘झोनिंग’ करून केला जाणार आहे.

(हेही वाचा – इतकं मोठं घबाड पाहून अधिकारीच झाले थक्क!)

‘या’ भागात पाणी पुरवठा राहणार बंद

बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत इंदिरानगर, श्रीनगर, रामनगर, लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, गायमुख, बाळकुम, कोलशेत, आझादनगर या भागात पाणीपुरवठा बंद राहील. तसेच बुधवार रात्री ९ ते गुरुवार सकाळी ९ वाजेपर्यंत समतानगर, ऋतूपार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा, आकृती, सिद्धेश्वर, जॉन्सन, इटरर्निटी व मुंब्य्राच्या काही भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. या ‘शटडाऊन’मुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा पुर्वपदावर येईपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.