स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश तेव्हा हिंदूंना जातीपातींमध्ये विभागत होते, त्यावेळी वीर सावरकर यांनी हिंदू धर्माची व्याख्या सांगितली. सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या भूमीला जे पुण्यभूमी आणि पितृभूमी मानतात असे वीर सावरकर म्हणाले. ज्यामध्ये जैन, शीख, बौद्ध, आर्य, नास्तिक हे सगळे या व्याख्येत येतात. १९३९ साली वीर सावरकरांनी म्हटले होते की, या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल. वीर सावरकर यांच्या हिंदूध्वजाखालील हिंदू राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी केले
हिंदू जनजागृती समितीच्या प्रांतीय हिंदू अधिवेशनात ‘वीर सावरकर यांचे हिंदुत्व’ या विषयावर त्या बोलत होत्या. शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, रत्नागिरीत कोठडी होती, ज्याला ७ दरवाजे होते, त्या कोठडीतून कुणीही बाहेर पडू शकत नाही, त्या कोठडीतून एक ग्रंथ बाहेर आला, त्याचे प्रकाशन नागपुरात झाले. त्याचे नाव ‘इसेन्शिअल ऑफ हिंदुत्व’ असे नाव होते आणि लेखकाचे नाव होते स्वातंत्र्यवीर सावरकर. १९२७ मध्ये नारायण सावरकर यांनी या ग्रंथाचे अनुवादन केले. हिंदुत्व या नावाचा हा ग्रंथ आहे, जो वीर सावरकर यांनी पहिल्यांदा इंग्रजी भाषेत लिहिला आहे. हा ग्रंथ लिहिण्याची आवश्यकता का भासली? कारण हिंदू धर्मावर अनेक आक्रमणे होत होती, त्या हिंदूंना संघटित करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदुत्व ग्रंथ लिहिला असे मंजिरी मराठे म्हणाल्या.
(हेही वाचा – हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आपल्या विचारांच्या पत्रकारांची निर्मिती करावी; स्वप्नील सावरकर यांचे आवाहन)
Join Our WhatsApp Community