घामाने भिजलेले मुंबईकर पावसाच्या एन्ट्रीने सुखावले

117

पावसाच्या गैरहजेरीने दिवसभर घामाने भिजलेल्या मुंबईकरांना सोमवारी रात्रीपासून पावसाच्या शिडकाव्यांचे अलगद सरप्राईज मिळाले. ब-याच दिवसांनी ओलेचिंब रस्ते पाहून मुंबईकर सुखावले. जवळपास आठवड्याभराहून अधिक काळ पाऊस मुंबईतून गायब आहे. त्यामुळे रात्री आणि सकाळी अचानकपणे सुरु झालेल्या पावसाच्या शिडकाव्यांनी मंगळवारचा दिवसही आल्हाददायक वाटत असल्याचा अनुभव मुंबईकरांना येत होता.

(हेही वाचा – संभाजीराजे छत्रपतींकडून परिवर्तनाच्या क्रांतीची घोषणा! म्हणाले, भेटूया…)

मुंबईसह मुंबई महानगरात पावसाचे शिडकावे

मुंबईसह मुंबई महानगर परिसरालाही पावसाच्या शिडकाव्यांचा अनुभव आला. मुंबईत दक्षिण मुंबईतील बहुतांश भागांत सकाळपासूनच पावसाच्या शिडकावे सुरु झाले. गिरगाव, मुंबई सेंट्रल, भायखळा, फोर्ट, परळ आदी परिसरात भल्या पहाटे पाच वाजल्यापासून पावसाचे शिडकावे सुरु झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात २८ मिमी, भायखळ्यात २९ मिमी, चेंबूरमधील टाटा पॉवर परिसरात ११ मिमी, जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालय परिसरात १०.४१ मिमी, दिंडोशीत ११.४ मिमी, मालाडला ११.१७ मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरांतील बहुतांश भागांत मात्र पावसाची गैरहजेरी दिसली. काही भागांत केवळ तासाभरासाठी हलके शिडकावे सुरु होते. मंगळवारी सकाळी साडेआठच्या नोंदीत गेल्या २४ तासांत सांताक्रूझ केंद्रात केवळ १०.८ मिमी पावसाची नोंद झाली.

दिवसभर वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता

पावसामुळे घामाच्या धारांना आज ब-यापैकी ब्रेक लागल्याचा अनुभव येत असल्याने दुपारही घामाच्या धारांशिवायच होऊ दे, अशा भावना मुंबईकरांच्या चेह-यावर उमटत आहेत. मंगळवारी दिवसभऱ वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. परंतु आर्द्रता जास्त असल्याने पावसाचे शिडकावे सुरुच राहतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्यातील अधिका-यांनी व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.