अवघ्या काही दिवसांनी नवं वर्ष सुरू होणार आहे. या नवं वर्षात तुम्हाला विवाहासाठी आवश्यक असणारे शुभ मुहूर्त माहित असल्यास ‘लगीन घाई’ करणं सोपं पडेल. हिंदू धर्मात विवाहासाठी शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. सहसा कुंडली बघूनच शुभ मुहूर्त काढला जातो. तेव्हा नव्या वर्षात कोणत्या महिन्यात किती मुहूर्त आहे, ते जाणून घ्या…
(हेही वाचा – औषधांचंही ‘आधार’कार्ड! पुढील वर्षापासून औषधांवर होणार ‘बारकोड आणि QR’ अनिवार्य)
या चार दिवशी तिथी न बघता करता येणार लग्न
ज्योतिषशास्त्रानुसार, असे चार दिवस आहेत, ज्या दिवशी मुहूर्त न बघताही लग्न किंवा धार्मिक विधी करता येते. अक्षय तृतिया, देवउठनी एकादशी, वसंत पंचमी आणि आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील भडली नवमी या चार दिवशी तुम्हाला लग्न किंवा शुभ कार्य करताना तिथी बघायची गरज नाही. तर दुसरीकडे विवाहासारख्या शुभ कार्यासाठी शुक्र ग्रह उदय स्थितीत असणं आवश्यक आहे. येणाऱ्या नव्या वर्षात एकूण ५९ शुभ मुहूर्त आहेत. हे शुभ मुहूर्त जानेवारी, फेब्रुवारी, मे, जून, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात आहे. २०२३ सुरू होताच जानेवारी महिन्यात ९ तारखेला फेब्रुवारी महिन्यात १३, मे महिन्यात १४ तर जून महिन्यात ११, नोव्हेंबर महिन्यात ५ आणि डिसेंबर महिन्यात ७ तारखेला शुभ मुहूर्त आहे.
हा आहे शुभ मुहूर्ताचा महिना आणि तारीख
जानेवारी
15, 16, 18, 19, 25, 26, 27, 30 आणि 31 तारीख
फेब्रुवारी
6, 7, 8, 9 10, 12, 13, 14, 15, 17, 22, 23 आणि 28 तारीख
मे
4, 6, 8, 9, 10, 11, 15, 16, 20, 21, 22, 27, 29 आणि 30 तारीख
जून
1, 3, 5, 6, 7, 11, 12, 23, 24, 26 आणि 27 तारीख
नोव्हेंबर
23, 24, 27, 28 आणि 29 तारीख
डिसेंबर
5, 6, 7 8, 9, 11 आणि 15 तारीख
Join Our WhatsApp Community