भारतीय वंशाचे सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक M. Night Shyamalan

144
भारतीय वंशाचे सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक M. Night Shyamalan

मनोज नेलियाट्टू “एम. नाईट” श्यामलन (M. Night Shyamalan) हे एक अमेरिकन चित्रपट लेखक आहे. विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटांची एकत्रित कमाई जागतिक स्तरावर ३.३ अब्ज डॉलरपेक्षाही जास्त आहे. श्यामलन यांना दोन अकादमी पुरस्कार, दोन बाफ्टा पुरस्कार आणि गोल्डन ग्लोबसाठी नामांकनांसह विविध पुरस्कार मिळाले आहेत.

श्यामलन (M. Night Shyamalan) यांचा जन्म ६ ऑगस्ट १९७० रोजी पाँडिचेरी मधील गावात झाला. त्यांचे वडील, डॉ. नेलियाट्टू सी. श्यामलन न्यूरोलॉजिस्ट आहेत. त्यांची आई, डॉ. जयलक्ष्मी श्यामलन एक ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनॅक आहे. श्यामलन पूर्वी कार्यकारी निर्माता म्हणून काम करायचे. तसेच सायन्स फिक्शन मालिका वेवर्ड पाईन्स, सायकोलॉजिकल हॉरर मालिका सर्व्हंट चे त्यांनी दिग्दर्शक होते. तसेच ते शो-रनर म्हणून देखील काम करायचे.

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : अल्काराझला हरवत नोवाक जोकोविचचं पहिलं ऑलिम्पिक सुवर्ण)

प्रेईंग विथ अँगर, वाइड अवेक हे त्यांचे सुरुवातीच्या काळातले चित्रपट होते. १९९९ साई आलेल्या द सिक्स्थ सेन्स या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट पटकथा यासाठी अकादमी पुरस्कार नामांकन मिळाले होते. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले. ज्यामध्ये त्यानंतर त्याने अनब्रेकेबल, सायन्स आणि द व्हिलेज या चित्रपटांचा समावेश होतो. लेडी इन द वॉटर, द हॅपनिंग, द लास्ट एअरबेंडर आणि आफ्टर अर्थ हे त्यांचे चित्रपट फारसे चालले नाहीत.

मात्र द व्हिजिट, स्प्लिट, ग्लास, ओल्ड, नॉक ॲट द केबिन आणि ट्रॅप हे त्यांचे चित्रपट गाजले आणि त्यांच्या कारकीर्दीला लागलेली उतरती कळा सावरली गेली. श्यामलन यांचे चित्रपट अतिशय वेगळे आणि विशेष असतात. त्यांच्या चित्रपटाचा अंत अनुमान लावता न येण्यासारखा असतो. श्यामलन हे अतिशय उत्कृष्ट लेखकांपैकी एक आहेत. भारतीय असूनही ते हॉलिवुड चित्रपटसृष्टी गाजवत आहेत, ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. (M. Night Shyamalan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.