पश्चिम बंगालमध्ये पिकअप वाहनात विजेचा प्रवाह पसरून १० ठार, १६ गंभीर जखमी

पश्चिम बंगालमधील कूचबिहारमध्ये पिकअप वाहनात विजेचा प्रवाह पसरून वाहनातील १० जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य १६ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.

मेखलीगंज पोलीस ठाण्याच्या परिसरातील धरला पुलावर ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. माताभंगाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित वर्मा आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डीजे सिस्टीमसाठी पिकअपमध्ये ठेवण्यात आलेल्या जनरेटमुळे हा वीजप्रवाह पिकअपमध्ये पसरला आणि त्यातून ही दुर्घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

( हेही वाचा: राजकीय सत्ता आणि वीर सावरकर… )

पीकअप वाहनाचा चालक फरार 

वाहनाच्या मागील बाजूस हे जनरेटर ठेवण्यात आले होते. या वाहनात २७ जण प्रवास करत होते. विजेचा धक्का लागून प्रवाह वाहनात पसरला. त्यामुळे १० जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य १६ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, वाहन चालक फरार आहे. दरम्यान जखमी आणि ठार झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here