पश्चिम बंगाल: दुर्गा विसर्जनादिवशी अचानक आलेल्या पुरामुळे 10 जणांचा मृत्यू

136

पश्चिम बंगालमध्ये बुधवारी रात्री दुर्गा विसर्जन दरम्यान मोठी दुर्घटना घडली. जलपायगुडी येथील माल नदीत विसर्जनादरम्यान अचानक आलेल्या पुरामुळे 10 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक अद्याप बेपत्ता आहेत. याशिवाय अनेकजण अजूनही नदीत अडकले आहेत. NDRF ची टीम रात्री उशिरापर्यंत बचावकार्य करत होती. या अपघातातील मृतांचा आकडा वाढू शकतो. आतापर्यंत 10 मृतदेह नदीमधून बाहेर काढण्यात आले आहेत, तर 10 जखमींनाही बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही जवळपास 30 ते40 लोक बेपत्ता आहेत.

अजूनही 30 ते 40 लोक बेपत्ता

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या वेळी माल नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने जोरदार प्रवाहात अनेक लोक वाहू गेले. घटनेची माहिती मिळताच एकच गोंधळ उडाला, तसेच पाण्यात वाहून गेलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरड सुरु केला. या अपघातात 10 जणांचे मृतदेह सापडले असून, 10 जखमींना वाचवण्यात यश आले आहे.

( हेही वाचा:  त्यांनी मैदान जरी मिळवलं, तरी शिवसेनाप्रमुखांचे विचार आमच्यासोबत; एकनाथ शिंदेंचा पलटवार )

अचानक नदीच्या पाण्याच्या पातळीत झाली वाढ

दुर्गा देवीच्या मूर्ती विसर्जनासाठी माल नदीवर नेल्या जात होत्या. विसर्जनाच्या कार्यक्रमात सहभागी असेलेले लोक खूप आनंदित दिसत होते. महिला एकमेकांना सिंदूर लावून दुर्गादेवीला निरोपाचे गीत गात होत्या. सायंकाळी विधिवत दुर्गा मातेची मूर्ती नदीत नेण्याचे काम सुरु झाले. यावेळी अनेक महिला व पुरुषांनी नदीच्या मध्यभागी उभे राहून देवी दुर्गाला निरोप दिला आणि बघता बघता नदीच्या पाण्याची पातळी वाढली. लोकांना काही समजेल तोपर्यंत नदीच्या पाण्याची पातळी वाढली. पाण्याचा वेग इतका होता की किना-यावर उभे असलेल्या लोकांनाही काहीच मदत करता आली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.