देशाच्या राजकारणात काळा इतिहास म्हणून पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक नोंदवली जाईल, अशी धक्कादायक तथ्ये समोर येऊ लागली आहेत. निवडणुकीचा निकाल लागताच २ ते ५ मे या चार दिवसांत तृणमूल काँग्रेसचा उन्माद अवघ्या देशाने पहिला. जाळपोळ, बलात्कार, हत्या अशा घटनांनी अक्षरश: उच्छाद मांडला. त्यामुळे अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होऊ लागली होती. या कालखंडात एकूण १५ हजार दंगली झाल्या. त्यामुळे या ठिकाणी निवडणूक झाली कि अराजक माजले होते, असा प्रश्न पडतो.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच ४ दिवस जो हिंसाचार झाला, त्याचा अहवाल प्रकाशित झाला आहे. ‘कॉल फॉर जस्टीस’ अर्थात न्याय कि पुकार या स्वयंसेवी संस्थेचा हा अहवाल आहे. याकरता या संस्थेने उच्चाधिकाऱ्यांची समिती स्थापन केली होती. त्यामध्ये अध्यक्षपदी सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती (निवृत्त) पेरमोद कोहली हे होते, तर केरळचे माजी मुख्य सचिव आनंद बोस, झारखंडचे माजी पोलिस महासंचालक निर्मल कौर, आयसीएसआयची माजी अध्यक्ष निसार अहमद, कर्नाटकचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव मदन गोपाल हे या समितीमध्ये सदस्यपदी होते.
(हेही वाचा : धर्मांतराचे दहशतवादी कनेक्शन : पाकिस्तानसह आखाती देशांपासून बीडपर्यंत पसरले जाळे!)
काय म्हटले या अहवालात?
- वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि अन्य माध्यमांमध्ये हिंसाचाराच्या घटना या अहवालासाठी अभ्यासण्यात आल्या.
- सामाजकंटकांनी घरे, दुकाने, वाहनांची जाळपोळ, दुकानांची लूट, बलात्कार, खून, स्थावर आणि जंगम मालमत्तेचे नुकसान केले.
- हा हिंसाचार विशिष्ट पक्षाचे समर्थक, मतदार, नेते आणि पदाधिकारी यांच्या बाबतीत घडला आहे.
- २ ते ५ मे या चार दिवसांत महिलांसह २५ जणांचा खून करण्यात आला.
- तब्बल १५ हजार दंगली घडवण्यात आल्या होत्या.
- तब्बल ७ हजार महिलांचा विनयभंग करण्यात आला.
- राज्यातील २६ पैकी १५ जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराचा परिणाम झाला.
- हिंसाचाराला घाबरून मोठ्या संख्येने लोक आसाम, झारखंड आणि ओडिसा या राज्यात पळून गेले.
- हा हिंसाचार घडवून आणणाऱ्या कुख्यात गुंडांना सत्ताधारी पक्षाकडून संरक्षण देण्यात आले.
- विशिष्ट पक्षाचे बूथ एजंट, कार्यालयातील कर्मचारी, मतदार आणि पक्षाचे समर्थक यांच्यावर हल्ले करण्यात आले आहेत.
(हेही वाचा : शिखांमध्ये पसरतोय’ लव्ह जिहाद’! खलिस्तानींच्या आडून भारतीय शीख लक्ष्य!)
Join Our WhatsApp Community