Railway Recruitment 2022: पश्चिम मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी! २५०० हून अधिक पदांकरता मागवले अर्ज

अनेक तरूणांची रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. ही इच्छा असणाऱ्या तरूणांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पश्चिम मध्य रेल्वेने तरूणांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. अप्रेंटिसच्या पदांकरता पश्चिम मध्य रेल्वेने इच्छुक असणाऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. तुम्हाला देखील अर्ज करायचा असेल तर संपूर्ण माहिती जाणून घ्या..

इच्छुक आणि पात्र उमेदवार wcr.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर १७ डिसेंबरपर्यंत रिक्त पदांकरता अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेत पश्चिम मध्य रेल्वेने एकूण २ हजार ५२१ अप्रेंटिसच्या पदांकरता अर्ज मागवले आहेत. या रिक्त पदांसाठी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी उमेदवारांचे वय १५ वर्ष पूर्ण झालेले असावे आणि वय वर्ष २४ पेक्षा जास्त नसावे. राखील प्रवर्गातील उमेदवारांसाठी अधिक वयाची सवलत लागू आहे.

(हेही वाचा – MHADA Lottery: कोकण म्हाडाच्या 4 हजारांहून अधिक घरांसाठी ‘या’ महिन्यात निघणार सोडत!)

काय आहे शैक्षणिक पात्रता

अर्जदारांनी संबंधित ट्रेडमध्ये किमान ५० टक्के गुणांसह इयत्ता १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासह आयटीआय असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्जदार उमेदवारांनी इयत्ता १० वीमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. यानंतर उमेद्वारांची निवड केली जाईल.

किती असणार अर्ज शुल्क

पश्चिम मध्य रेल्वेच्या अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवारांना १०० रूपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर महिला एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here