Indian Railway Recruitment: १० वी पास आहात? रेल्वेत नोकरी करण्याची संधी, 2500 हून अधिक पदांवर भरती

107

सरकारी नोकरी करण्याची सगळ्यांची इच्छा असते. अशातच भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. दहावी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी मिळण्याची उत्तम संधी आहे. कारण पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिसच्या २ हजारांहून अधिक पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी १७ डिसेंबरपूर्वी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. या भरतीकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागणार आहे. त्यासाठी पश्चिम मध्य रेल्वे रेल्वेच्या wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज दाखल करता येणार आहे.

(हेही वाचा – आता शिक्षकांचं ‘टेन्शन’ वाढणार! कारण शिक्षकांना द्यावी लागणार ‘परीक्षा’!)

जाणून घ्या सविस्तर

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये (West Central Railway) अप्रेंटिस या पदाच्या भरतीअंतर्गत एकूण २ हजार ५२१ पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असून शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे इच्छुक उमेदवारांनी लक्षात घ्यावे.

अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षादरम्यान, असणे आवश्यक आहे. तर आरक्षित प्रवर्गात असलेल्या उमेदवाराला सरकारी नियमाने वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे. या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. यासह त्यांच्याकडे संबंधित क्षेत्रातील आय़टीआय डिप्लोमा (NCVT किंवा SCVT) असणं आवश्यक आहे. रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड दहावीचे गुण आणि गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे. या अर्जाचे शुल्क १०० रूपये असून SC, ST, PWD प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही.

असा करा अर्ज

  1. सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. यानंतर Go To Contacts पर्याय निवडून Recruitment मध्ये जा.
  3. Railway Recruitment Cell वर क्लिक करून शेवटी 2022-23 साठी Engagement of Act Apprentices For 2022-23 वर क्लिक करा.
  4. आता Apply लिंकवर क्लिक करून नोंदणी करा. यानंतर अर्ज भरून कागदपत्रं अपलोड करा आणि शुल्क जमा करून फॉर्म सबमिट करा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.