एलीफंटा बेटावर सोमवारी रात्री व्हेल माशाचा मृतदेह जेट्टीच्या खडकात अडकला. हा मृतदेह संपूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने रात्रभर एलिफंटा जेट्टी परिसरात दुर्गंधी पसरली होती. अखेर दुसऱ्या दिवशी खडकाळ भागातून मृतदेह काढताना वनाधिकाऱ्यांना यश आले.
खडकात अडकलेला मृतदेह काढण्याचे आव्हान
मंगळवारी सकाळी बेटावर अडकलेला मृतदेह वनाधिकाऱ्यांनी दोरीला बांधून काढायला सुरुवात केली. मात्र मृतदेहाला चांगलीच दुर्गंधी पसरली होती. अखेरीस दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोरीला बांधलेला मृतदेह बोटीच्या माध्यमातून खेचून खडकातून काढला.
( हेही वाचा: डिसेंबर महिन्यात ‘स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई’ अभियान )
मृतदेह फुटला!
खडकात सडलेला मृतदेह तब्ब्ल 8 टन वजनाचा होता. 36 फुटांचा मृतदेह अंदाजे दोन आठवड्यापूर्वीचा होता. मात्र दोरीकडून खेचताना पोटाकडून फाटला गेला. अखेरीस एलीफंटा जेट्टीपरिसर आणि पर्यटकांना मृतदेहामुळे पसरलेल्या दुर्गंधीतून मुक्ती मिळाली.
Join Our WhatsApp Community