हे माहीत आहे का? तुमच्या ‘परफ्युम’ मध्ये आहे व्हेल माशाची ‘उलटी’

या उलटीची बेकायदेशीररित्या विक्रीचा प्रयत्न करणा-यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे.

आपल्या शरीराची दुर्गंधी झाकण्यासाठी आपण परफ्युम वापरतो. परफ्युमच्या सुगंधाने आपल्याला आणि आपल्या प्रियजनांना कसं एकदम प्रसन्न वाटतं. त्या सुगंधाने तरुणी तरुणाकडे चुंबकाप्रमाणे आकर्षित होतात याच्या अनेक जाहिराती सुद्धा आपण पाहिल्या आहेत.

पण हाच परफ्युम एका प्राण्याच्या उलटीपासून तयार केला जातो, हे जर तुम्हाला कळलं तर? आता ही परफ्युमप्रमाणे हवेत पसरणारी अफवा नाही, तर सत्य आहे. इतकंच नाही तर या उलटीची बेकायदेशीररित्या विक्रीचा प्रयत्न करणा-यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

लक्षद्वीप बेटांवरुन एक कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या व्हेल माशाच्या एम्बग्रिसच्या विक्रीप्रकरणी केरळ वन अधिका-यांनी तीन जणांना अटक केली आहे. एम्बग्रिस ही व्हेल माशाची उलटी म्हणून ओळखली जाते. लक्षद्वीप समुद्रातील जायंट स्पर्म व्हेलची हत्या करुन, हे एम्बग्रिस काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

परफ्युममध्ये का वापरतात उलटी?

ही उलटी व्हेल माशाच्या पचनसंस्थेत तयार होते. या उलटीला सुगंध येत असून, हा सुगंध जास्त काळ टिकून राहतो. म्हणून परफ्युममध्ये सुगंध जास्त काळ टिकवून ठवण्यासाठी सुगंधी द्रव्यांसोबत या उलटीचा वापर केला जातो. याच कारणामुळे अनेक परफ्युम कंपन्या व्हेल माशाची उलटी महाग किंमतीला किंवा काही वेळा बेकायदेशीररित्या विकत घेत असतात. तसेच या एम्बग्रिसचा समावेश काही औषधांमध्ये सुद्धा करण्यात येतो.

कायद्यानुसार विक्रीवर बंदी

1972च्या वन्यजीव(संरक्षण) कायद्यानुसार एम्बग्रिसच्या अवैध विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. याच वर्षी जुलै महिन्यात सुद्धा वन विभागाने केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील चेतुवा येथून सुमारे 30 कोटी रुपयांचे एम्बग्रिस जप्त करत, तीन जणांवर कारवाई केली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here