ऍनिमेशन चित्रपटात कोणतीही गोष्ट बोलू शकते. प्राणी बोलतात, कपाट बोलतं तशी पुस्तकंही बोलतात. हे टिव्हीवर किंवा मोठ्या स्क्रीनवर पाहायला बरं वाटतं. पण विचार करा, जर खरोखर पुस्तकं बोलू लागली तर? डेनमार्कमध्ये पुस्तकं बोलतात. काय? खरं नाही वाटत? चला तर मग जाणून घेऊया.
डेनमार्कमधील एक आंतरराष्ट्रीय संघटन म्हणजे मानव पुस्तकालय म्हणजेच ह्युमन लायब्ररी. इथे पुस्तकांच्या ऐवजी त्या विषयातले तज्ञ तुमच्याशी त्या अमूक विषयावर संवाद साधतात. या पुस्तकालयातून तुम्ही पुस्तकांऐवजी माणसांना घेऊन जाऊ शकता. हे स्वयंसेवक असतात.
(हेही वाचा आरटीई अंतर्गत बालकांना प्रवेश घेण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ)
तुम्ही पुस्तकाच्या ऐवजी उपलब्ध असलेल्या स्वयंसेवकांशी संवाद साधू शकता, त्यांना प्रश्न विचारु शकता. २००० सालापासून या मानव पुस्तकाची सुरुवात झाली आहे. ८० पेक्षा अधिक देशांमध्ये हे मानव पुस्तकालय उपलब्ध आहे. जे लोक काही विशेष गोष्टींवर चर्चा करायला घाबरतात, त्या मुद्दांवर चर्चा व्हावी, त्यांचं मन मोकळं व्हावं म्हणून मानक पुस्तकालयाची स्थापना करण्यात आली आहे.
संस्थेचे संस्थापक रोनी एबर्जेल असून अंदलीब कुरेशी यांनी मुंबईत देखील असा प्रयोग करुन पाहिला आहे. त्यामुळे मुंबईसह भारतात देखील हा प्रयोग पुढे सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुस्तकांशी थेट संवाद साधण्याची ही वेगळीच पद्धत उल्लेखनीय आहे.
Join Our WhatsApp Community