आता काही सेकंदात सिनेमा होणार डाऊनलोड, काय आहेत 5G इंटरनेटची वैशिष्ट्ये?

5G Spectrum चा लिलाव अखेर सोमवारी, १ ऑगस्ट रोजी संपुष्टात आला. सध्या भारतात मोबाईल आणि इंटरनेट क्षेत्रात आघाडीच्या असलेल्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल यांनी या कंपन्यांनी लिलावात बाजी मारली आहे. आता संपूर्ण देशात एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्या 5G चे जाळे पसरवणार आहेत. 5G स्पेक्ट्रममधून आता केंद्र सरकारला तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जाणून घ्या 5G नेटवर्कसंबंधी महत्वाच्या गोष्टी!  

  • 5G नेटवर्कमुळे 4G पेक्षा जास्त स्पीड मिळणार आहे. जिथे तुम्हाला 4G नेटवर्कवर 100Mbps पर्यंत स्पीड मिळेल, तिथे 5G वर तुम्हाला 10 पट जास्त स्पीड मिळेल म्हणजेच GBPS मध्ये हे स्पीड मिळणार आहे. म्हणजेच 4GBचा चित्रपट तुम्ही अवघ्या काही सेकंदात चित्रपट डाउनलोड करू शकाल.
  • 4G नेटवर्क आल्यानंतरही अनेक क्षेत्रे अशी आहेत जिथे नेटवर्कची सुविधा नाही. 5G च्या माध्यमातून दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या नेटवर्कची श्रेणी वाढवण्याचा आणखी एक मार्ग मिळेल. तथापि, ते नेटवर्क नुकतेच सुरू होत आहे, त्यामुळे आणखी शहरांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल. म्हणजेच 5G सेवा भारतात सुरू होणार असली तरी छोट्या शहरांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल.

(हेही वाचा संजय राऊतांना मनी लाँड्रिंग अंतर्गत अटक, कोठडीतील मुक्काम वाढणार?)

  • रिपोर्ट्सनुसार, 5G ला 4G पेक्षा 10 पट जास्त स्पीड मिळेल. म्हणजेच, वापरकर्ते उच्च दर्जाचे, अल्ट्रा हाय रिझोल्यूशन 4K व्हिडिओ कॉल करण्यास सक्षम असतील. 5G वर, तुम्हाला 4G च्या तुलनेत चांगली कनेक्टिव्हिटी आणि कॉलिंग सुविधा मिळेल.
  • 5G सेवा आल्यानंतर तुम्ही स्लो स्पीडपासून मुक्त व्हाल. यासोबतच तुम्ही एचडी क्वालिटीमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग करू शकाल. वायफाय नेटवर्क नसतानाही तुम्ही व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि व्हिडिओ चॅटचा लाभ घेऊ शकाल. फोनवर गेमिंग देखील पूर्वीपेक्षा खूप चांगले होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here