UIDAI: केंद्र सरकार देतंय नवीन आधारकार्ड, कोणासाठी आहे?

तुमच्या आधार कार्डचा रंग कोणता आहे? हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का? वास्तविक आधार कार्डचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. साधारणपणे पांढऱ्या कागदावर काळ्या रंगात आधार कार्ड छापलेले असतात. पण जेव्हा हे आधार कार्ड मुलांसाठी (बाल आधार कार्ड) बनवले जाते, तेव्हा त्याचा रंग हा वेगळा असतो. आधार कार्ड हे भारतातील ओळखीच्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक मानले जाते. आजच्या काळात आधारमुळे सरकारी सुविधांचा लाभ घेणे खूप सोपे झाले आहे. 12-अंकी युनिक कोड ऑफ आधार (UIDAI) द्वारे, बँकिंगपासून सर्व सरकारी कागदपत्रे या एका कागदपत्रांशी जोडणे शक्य झाले आहे. आधारच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीचे पूर्ण नाव, पत्ता आणि जन्मतारीख शोधणे सोपे झाले आहे. आधार हे विविध क्षेत्रात ओळखपत्र म्हणून वापरले जाणारे महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. मात्र केंद्र सरकारने आणखी एक नवे आधारकार्ड देखील काढले असून ते कोणासाठी आहे?, ते कसे आहे? हे तुम्हाला माहित आहे का?

जाणून घ्या Blue Aadhaar Card बद्दल…

आधार कार्डचे दोन प्रकार आहेत एक प्रौढांसाठी आणि दुसरे मुलांसाठी ज्याला ‘बाल-आधार’ म्हणतात. केंद्र सरकारने काढलेले नवे आधारकार्ड हे लहान मुलांसाठी आहे. त्याचा रंग निळा असून त्याला ब्लू आधार किंवा बाल-आधार असे संबोधले जाते. जाणून घ्या, निळे आधार कार्ड म्हणजे काय?

आता पालक नवजात बाळासाठीही बाल-आधारसाठी अर्ज करू शकतात. माहितीनुसार, पाच वर्षापूर्वीच्या मुलांसाठी बायोमेट्रिक्स विकसित केले गेले नाही, त्यामुळे मुलांच्या निळ्या रंगाच्या आधार डेटामध्ये फिंगरप्रिंट आणि आईरिस (डोळे) स्कॅनसारख्या बायोमेट्रिक माहितीचा समावेश नव्हता. UIDAI मते, मुलाने वयाची पाच वर्षे ओलांडल्यानंतर बायोमेट्रिक्स अपडेट केले जाते. तसेच नवजात मुलाचे आधार कार्ड बर्थ डिस्चार्ज सर्टिफिकेट आणि पालकांच्या आधार कार्डद्वारे तयार केले जाते.

ब्लू आधार कोणासाठी आहे आवश्यक?

ब्लू आधार कार्ड किंवा निळ्या रंगाचे 12 अंकी आधारकार्ड 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बनवले जाते. 5 वर्षांनी ते अवैध होते, ते पुन्हा अपडेट करावे लागेल. UIDAI च्या नियमांनुसार, नवजात मुलाचे आधार 5 वर्षे वयापर्यंत वापरता येते त्यानंतर त्यात 5 वर्षांनी अपडेट करावे लागते. अपडेट न केल्यास ते निष्क्रिय होते. 5 वर्षानंतर मूल 15 वर्षांचे झाल्यावर बायोमेट्रिक अपडेट करावे लागते. मुलाचे 5 वर्षे पूर्ण झाल्यावर, त्याचे बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल. नवजात मुलाचे बोटांचे ठसे घेतले जात नाहीत. पण मूल 5 वर्षांचे झाल्यावर आधार अपडेट करणं अनिवार्य असते.

असे काढा ब्लू आधार कार्ड

  • तुमच्या मुलाला तुमच्यासोबत नावनोंदणी केंद्रात घेऊन जा. तेथे नावनोंदणीसाठी फॉर्म भरा आणि सबमिट करा.
  • कागदपत्र म्हणून पालकाला त्यांचे आधार कार्ड द्यावे लागेल.
  • तुम्हाला एक फोन नंबर देण्यास सांगितले जाईल ज्या अंतर्गत बाल आधार कार्ड जारी केले जाईल.
  • बाल आधारमध्ये बायोमेट्रिक माहिती आवश्यक नाही, फक्त एक फोटो क्लिक केला जाईल.
  • कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर एक मॅसेज येईल. पडताळणीच्या 60 दिवसांच्या आत तुमच्या मुलाला ब्लू आधार कार्ड जारी केल जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here