Body Shaming काय असते? ते आता शाळेत शिकवले जाणार

एखाद्या व्यक्तीला त्याच्या शरीराची ठेवण, रंग, रुप, उंची, वजन यासारख्या गोष्टींवरुन हिणवले जाते, त्याला बाॅडी शेमिंग असे म्हणतात. केरळ सरकारने शालेय विद्यार्थ्यांमध्ये बाॅडी शेमिंगच्या प्रकाराबद्दल जागृती निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये या जनजागृती मोहिमेचा समावेश करण्यात येईल. ही माहिती केरळ राज्याचे शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी दिली आहे.

व्ही. शिवनकुट्टी यांनी सांगितले की, बाॅडी शेमिंग हा घृणास्पद प्रकार आहे. विवेकबुद्धी गमावलेले लोक असे प्रकार करतात व त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. एका पोस्टमध्ये शिवनकुट्टी यांनी म्हटले आहे की, माझ्या पोटाचा वाढलेला घेर कमी करा, अशी टिप्पणी एक व्यक्तीने केली होती. माझ्यासोबत बाॅडी शेमिंगचा प्रकार घडला. तसा अनुभव अनेक लोकांना आला आहे.

( हेही वाचा: शनिवार वाड्याच्या पटांगणातला दर्गा काढण्याची मागणी )

शाळा बदलावी लागली

शिवनकुट्टी यांच्या एका मित्राच्या भावाला त्याच्या रंगरुपावरुन नेहमी चिडवले जात असे. याबाबत त्या मुलाने शिक्षकांकडे तक्रार केल्यानंतर त्याच्या वर्गातील मुले आणखी चिडवू लागली. त्यामुळे मानसिक तणावामुळे  या मुलाने नाइलाजाने अखेर आपली शाळा बदलली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here