गडचिरोलीत नक्षल्यांचा खात्मा करणारी ‘सी-60’ आहे तरी कोण?

गडचिरोलीत महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० पथकाने २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.

747

शनिवारी, १३ नोव्हेंबर रोजी गडचिरोलीत महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० पथकाने उत्तम कामगिरी करत येथे २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे पुन्हा एकदा सी-६० पथक चर्चेत आले आहे. यानिमित्ताने काय आहे सी-६० पथक जाणून घेऊ!

 १९९० साली स्थापना 

गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन झाल्यापासून नक्षल कारवायांमध्ये वाढ झाली. म्हणून नक्षली कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी १ डिसेंबर १९९० रोजी के.पी. रघुवंशी (पोलिस अधीक्षक, गडचिरोली) यांनी सी-60 ची स्थापना केली. तेव्हा सी-60 मध्ये फक्त 60 सक्षम व विशेष कमांडोची नेमणूक करण्यात आली व पोलिस निरीक्षक एस.व्ही. गुजर हे सी-60 चे पहिले प्रभारी अधिकारी होते. गडचिरोली जिल्ह्यात नक्षल कारवायांवर वाढ झाल्याने परत त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी गडचिरोलीला दोन विभागात विभाजन केले. (उत्तर विभाग व दक्षिण विभाग) दक्षिण भागात नक्षल कारवायांवर वाढ झाल्याने प्राणहिता उप मुख्यालय येथे मार्च १९९४ साली सी-60 च्या दुसऱ्या मुख्यालयाची स्थापना झाली. सी-60 चा प्रत्येक जवान हा आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीला आळा घालण्यासाठी अथक परिश्रम करीत आहे. सी-60 पथक हे नक्षल्यांचा कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाते. सी-60 पथकाला यापूर्वी (क्रॅक कमांडो) या नावाने सुध्दा ओळखले जात होते.

सी-60 पथकाची धडक कारवाई

प्रशिक्षित सी-60 येथील जवान कठोर परिश्रम घेवून गडचिरोली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जावून पहाडी व अतिदुर्गम भागामध्ये नक्षल विरोधी अभियान राबवितात. दरम्यान नक्षल चळवळीमध्ये असणाऱ्यांच्या परिवाराला व नातेवाईकांना भेटून त्यांना आत्मसमर्पणबाबत विविध शासकीय सुविधा व योजनांचे मार्गदर्शन करुन त्यांचा लाभ घेण्यास त्यांचे मन परिवर्तन करुन त्यांना लोकशाहीच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यास प्रवृत्त करतात. मात्र कट्टर नक्षल वरील शासकीय योजनेला व लोकशाहीला विरोध करुन लोकांना शासना रुध्द भडकवतात, अशा जहाल व कट्टर नक्षल्यांचा शोध घेवून खात्मा केला जातो. तसेच त्यांचे व नक्षल चळवळीस आळा घालण्यास बहुमोल सहकार्य केले, तसेच अतिदुर्गम भागामध्ये जावून जनसंपर्क साधून शासनांचे विविध धोरण लोकांसमोर मांडून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम या जवान योग्यरित्या पार पाडत आहे.

(हेही वाचा पोलिसांची मोठी कारवाई! गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा)

जनतेच्या सुसंवाद व त्यांच्या समस्या

नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे अति दुर्गम व जंगल भागात अशा ठिकाणी कोणीही शासकीय अधिकारी/ कर्मचारी जात नाही, अशा गावात सी-60 पथके जावून तेथील लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतात. (जसे – वीज, रस्ते, तलाव, बोअरवेल, आरोग्य, शाळा, बससेवा) व मुख्यालय येथे आल्यावर वरीष्ठ अधिकारी यांना सांगून संबंधित कार्यालयाकडून सदरची कामे पूर्ण होईल, त्या अनुषंगाने इतर शासकीय विभागातील कार्यालयातील अधिकारी यांच्याशी चर्चा करुन सोडविण्याचा प्रयत्न करतो.

खेळ व व्यायाम

सी-60 पथके मुख्यालय येथे रिझर्व असतांना शारीरिकदृष्ट्या सक्षम राहण्याकरीता दररोज सकाळी शारीरिक व्यायाम, कवायत व सांघिक खेळ घेतले जातात. तसेच त्यांना नक्षल विरोध अभियान राबविण्याकरता वेळोवेळी नक्षल टॅक्टीस बद्दलची माहिती दिली जाते. तसेच त्यांना नैतिक व मानसिक मनोबल वाढविण्यासाठी मोटिवेशन लेक्चर, कमांडो मुव्हीज दाखविण्यात येते.

प्रशिक्षण

सी-60 पथकाला अति दुर्गम, संवेदनशील व पहाडी भागात ऊन, वारा, पाऊस, दिवस व रात्री येणाऱ्या आव्हानांना व समस्येला तोंड देण्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्टया सक्षम रहण्यासाठी त्यांना उच्च, विशेष व आधुनिक तंत्रज्ञाच्या पध्दतीचे विविध राज्यातील प्रशिक्षण संस्थेमध्ये जवानांना अतिशय खडतर प्रशिक्षणासाठी (ग्रे-हाऊन्स हैदराबाद, एन.एस.जी. मनेसर- हरियाणा – हजारीबाग, कांकेर, यु.ओ.टि.सी. नागपुर) पाठविले जातात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.