जागतिक पवन दिन (Global Wind Day) दरवर्षी १५ जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस पवन ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि या ऊर्जा स्त्रोताविषयी जागरुकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या ऊर्जेमुळे प्रदूषण होत नाही आणि हरितगृह वायू उत्सर्जित होत नाहीत. तसेच तेल आणि वायू यांसारख्या जीवाश्म इंधनावरील आपले अवलंबित्व कमी करण्यास मदत करू शकते. (Global Wind Day)
(हेही वाचा- Sikkim Flood : सिक्कीममध्ये पावसाचा हाहाकार! हजारो पर्यटक अडकले, 6 जणांचा मृत्यू)
जागतिक पवन दिन (Global Wind Day) ही जगभरातील लोकांसाठी एकत्र येण्याची, सकारात्मक बदल घडवून आणण्याची आणि पुढील पिढ्यांसाठी अधिक शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी पवन उर्जेची क्षमता अधोरेखित करण्याची जणू संधीच आहे. याद्वारे आपण लोकांना या स्वच्छ उर्जा स्त्रोताचा अवलंब करण्यासाठी आणि शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी एकत्र काम करण्यास प्रेरित करू शकतो. (Global Wind Day)
जागतिक पवन दिवस (Global Wind Day) दरवर्षी १५ जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा २००७ मध्ये युरोपियन विंड एनर्जी असोसिएशन आणि ग्लोबल विंड एनर्जी कौन्सिलद्वारे साजरा करण्यात आला. पवन ऊर्जेचे महत्त्व आणि त्याच्या शक्यतांबद्दल जागरूकता पसरवणे हा त्यामागचा उद्देश होता. या दिनाच्या माध्यमातून लोकांना हवेचे महत्त्व आणि प्रदूषणासारख्या समस्यांबद्दल जागरूक करता येते. (Global Wind Day)
(हेही वाचा- T20 World Cup 2024 : अमेरिका, कॅनडा सामना पावसात गेला वाहून, अमेरिका सुपर ८ मध्ये, पाकचं आव्हान संपुष्टात )
आपल्या आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी आणि सामाजिक विकासासाठी हवा स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त असणे अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त हवेचे रक्षण करणे, ही आपली जबाबदारी आहे. वीज निर्मिती करताना पवन ऊर्जा हरितगृह वायू उत्सर्जित करत नाही, ज्यामुळे हवामान बदलाशी लढण्यास मदत होते. तसेच पवन ऊर्जा हा अक्षय ऊर्जा स्त्रोत आहे, याचा अर्थ ती संपणारी ऊर्जा नाही. पवन ऊर्जा शाश्वत विकासाला प्रोत्साहन देते आणि ऊर्जा सुरक्षा प्रदान करते. पवन ऊर्जा उद्योगाने हजारो लोकांना रोजगार दिला आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. (Global Wind Day)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community