मकर संक्रांती (makar sankranti 2024) हा भारतातील एक प्रमुख सण आहे. हा सण भारतभर दरवर्षी जानेवारी महिन्यात साजरा केला जातो. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या केवळ चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो, या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो.
तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून ओळखला जातो तर कर्नाटक, केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये याला संक्रांती (makar sankranti 2024) म्हणतात. बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये हा सण ‘तीला संक्रांती’ या नावाने प्रसिद्ध आहे. काही ठिकाणी मकर संक्रांतीच्या सणाला उत्तरायण असेही म्हणतात. १४ जानेवारीपासून सूर्य उत्तरेकडे जाऊ लागतो. या कारणास्तव या सणाला ‘उत्तरायण’ असेही म्हणतात.
(हेही वाचा Ashwini Bhide : महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना ब्रिटिश एअरवेजकडून वर्णभेदाचा अनुभव? )
मकर संस्क्रांतीमध्ये (makar sankranti 2024) उपासनेला महत्व प्राप्त झाले आहे. या दिवशी जप, तप, दान धर्म करण्याला विशेष महत्व आहे. तूप, घोंगडी दान केल्यावर तुम्हाला मोठे पुण्य प्राप्त होते आणि जन्माच्या बंधनातून तुमची सुटका होते असे म्हटले जाते. महाराष्ट्रात तिळगुळाचे महत्व आहे. तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला असे आपण म्हणतो. दुरावलेली नाती या निमित्ताने जवळ येतात. यामागील शास्त्रीय कारण असे की तीळ आणि गुळ हे उष्ण पदार्थ असतात. थंडीमध्ये शरीराला उष्णता हवी असते. म्हणूनच तीळ गुळ खाण्याची प्रथा महाराष्ट्रात पडली.
गुजरातमध्ये तर पतंग उडवण्याची प्रथा आहे. अनेक गुजराती बांधव जणू परंपरा म्हणून पतंग उडवतात. महाराष्ट्रातही ही परंपरा सुरु झाली आहे. या दिवशी आकाशात पतंग उडताना दिसतात. मात्र थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. आपला खेळ इतरांच्या जीवावर बेतू नये म्हणून काळजी घेतलीच पाहिजे. विशेष म्हणजे पतंग उडवण्याचा शास्त्रीय लाभ आहे. या दिवशी सूर्याकडून चांगला प्रकाश मिळतो. त्यामुळे थंडीत होणार्या सर्दी, खोकला इत्यादी आजारांपासून सुटका मिळते. तसेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाचं महतव आहे. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. तसेच महिला वर्ग हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात आणि यामध्ये वाण देण्याची पद्धत आहे.
Join Our WhatsApp Community