Location दाखवणारे GPS उद्ध्वस्त करण्यासाठी बनवले होते

जगभरात कानाकोपऱ्यात गल्लीबोळाचा अचूक ठावठिकाणा मोबाईलच्या एका क्लिकवर मिळतो, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा माग एका क्षणात काढता येतो. त्यामुळे जीपीएस यंत्रणा सर्वांच्या जगण्यात अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. मात्र फार कमी लोकांना माहिती असेल या यंत्रणेच्या निर्मितीमागे युद्धनीती होती. ज्या जीपीएस यंत्रणेचा विध्वंसासाठी वापर होत होता ती आता जोडण्यासाठी वापरली जात आहे. अशा या यंत्रणेचा जनक शास्त्रज्ञ रॉजर एल ईस्टन यांचे ८ मे २०१४ रोजी निधन झाले.

ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (GLOBAL POSITIONING SYSTEM) असा जीपीएसचा फुल फॉर्म आहे आणि जीपीएस प्रणाली ही संपूर्ण जगातील दिशा दर्शवणारी सॅटेलाईट प्रणाली आहे. ही जीपीएस प्रणाली पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाची माहिती आणि वेळ जीपीएस रिसीव्हरला देते. या प्रणालीचा वापर करून आपण पृथ्वीवरील कोणत्याही रस्त्यांवर फिरू शकतो.

(हेही वाचा अखेर राज ठाकरेंच्या ‘वसंता’ची भोंगेविरोधी आंदोलनात एन्ट्री! महाआरतीचे आयोजन )

अण्वस्त्राशी होता जीपीएस शोधाचा संबंध

६० च्या दशकात अमेरिकेला तिच्या अण्वस्त्रवाहू पाणबुड्या कुठे आहेत याचा ठावठिकाणा लागावा म्हणून अमेरिकेच्या नौसेनेने उपग्रह पाठवला. ज्यामुळे या पाणबुड्यांवर लक्ष ठेवणे शक्य झाले. मात्र पुढे संरक्षण दलाला वेळ आणि स्थान याची अचूक माहिती मिळावी म्हणून स्थिर नेवीगेशन सिस्टीम असावी याकरता १९७० मध्ये अमेरिकेने १९७८ मध्ये पहिली नेवीगेशन सिस्टीम पाठवली १९९३ पासून २३ उपग्रह कार्यरत झाले.

जीपीएस काम कसे करते?

आता ३० सॅटेलाईटचे जीपीएस हे एक नेटवर्क बनले आहे जे आपल्या पृथ्वीच्या जमीनीपासून २०,००० किलोमीटर दूर आहे. आणि ते पृथ्वीच्या कक्षेत आजूबाजूला फिरत असते. जेव्हा आपण मोबाईलचे जीपीएस सुरू करतो तेव्हा ४ सॅटेलाईट आपले लोकेशन चेक करतात आणि वेळोवेळी या चार सॅटेलाइटमुळे आपल्या लोकेशनची आणि वेळेची माहिती सिग्नलद्वारा ट्रान्समिट केल्या जातात, या ट्रान्समिट केल्या गेलेल्या सिग्नलचा वेग ही विजेच्या वेगाइतका असतो आणि आपला मोबाईल या वेळी रिसीवरचे कार्य करतो. त्यामुळे आपल्याला योग्य लोकेशनची माहिती मिळते.

(हेही वाचा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये रंगणार सवाल-जवाब)

जीपीएसचा उपयोग

  • जीपीएस प्रणालीमुळे स्वत:चे लोकेशन माहिती घेणे
  • जीपीएस प्रणालीमुळे योग्य वेळेची माहिती मिळवून घेणे
  • जीपीएस प्रणालीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत होते
  • एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करणे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here