Indian Railway: ट्रेनच्या बोगीवर असलेल्या ‘या’ पिवळ्या रेषांचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?

179

भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेपेक्षा स्वस्त आणि चांगला मार्ग क्वचितच असेल. तुम्हीही अनेकदा भारतीय रेल्वेने प्रवास केला असेल, पण ट्रेनमध्ये अशी अनेक चिन्हे, खुणा आहेत, ज्याकडे तुमचे कधीच लक्ष गेले नसेल. आज तुम्हाला ट्रेनशी संबंधित अशीच एक माहिती देणार आहोत. ज्याबद्दल तुम्हाला कदाचिक माहिती नसेल. रेल्वे स्टेशनवर प्रवास करताना ट्रेनच्या काही स्पेशल डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या तिरकस रेषा तुम्हाला दिसल्या असतील. पण त्याचे कारण तुम्हाला माहित आहे का…

ट्रेनच्या काही बोगींवर पिवळ्या किंवा पांढर्‍या तिरकस रेषांचे पट्टे दिसतात, ज्या प्रामुख्याने टॉयलेट असणाऱ्या बोगींच्या अगदी वर असतात. पॅसेंजर ट्रेनच्या वरच्या बाजूला असलेल्या या तिरकस रेषा डिझाइन असल्याचे मानले जाते. मात्र, प्रत्यक्षात हा एक प्रकारचा संकेत (सिग्नल) आहे. या रेषा ट्रेनची सामान्य बोगी असल्याचे दर्शवितात, ज्यामध्ये आरक्षण नसलेले प्रवासी प्रवास करतात.

(हेही वाचा – Indian Railway: हिवाळ्यात ट्रेनची AC बंद असते, तरीही रेल्वे त्यासाठी शुल्क आकारते! पण का?)

जनरल बोगीच्यावर जनरल क्लास असे लिहिलेले असले तरी काही कारणास्तव जर तुम्हाला ते वाचता येत नसेल तर या रेषा बघून तुम्ही देखील समजू शकता की हे ट्रेनचे जनरल डबे आहेत. अशा परिस्थितीत, या रेषांच्या मदतीने, तुम्ही आरक्षित आणि अनारक्षित बोगींमधील फरक ओळखू शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.